फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय

March 13, 2022 , 0 Comments

स्टार्टअप या नुसत्या एका शब्दानं तळपायापासून ते पार मस्तकापर्यंत फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वाइब्स येतात. म्हणजे कसं ना तूम्ही सकाळ सकाळी एखादं सफरचंद खाल्ल तर त्याच्या कॅलरीज तुम्हाला दिवसभर मिळतात. तसचं दिवसातल्या एका स्टार्टअपच्या स्टोरीनं  पॉझिटिव्ह कॅलरीज देण्याचं काम भिडू करत असतो.

आता स्टार्टअपच्या स्टोऱ्या नुसत्या वाचण्या आणि ऐकण्यापेक्षा आपणही स्वत: चं काहीतरी सुरु करावं असं तुमच्या डोक्यात असणार…  कारण भिडू मन की बात बरोबर ओळखतो. त्यामुळं एक सल्ला तर हमखास बनतो की, स्टार्टअपमध्ये प्रॉफिट तर १०० टक्के आहे, पण त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्या म्हणजे सेल्फ कॉन्फीडन्स, हटके स्ट्रॅटेजी आणि क्वालिटी.

आता भिडूची सवय अशी की, उदाहरणाशिवाय तुमच्यापर्यंत काही पोहचवत नाही. त्यामुळं या सेल्फ कॉन्फीडन्स, हटके स्ट्रॅटेजी आणि क्वालिटीचं बेस्ट उदाहरण तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. ते म्हणजे यल्लो डायमंड ज्याला आपल्यातले काही प्रताप स्नॅक्स नावानं सुद्धा ओळखतात.

तर अमित कुमत हे या कंपनीचे किंगमेकर.  १९९२ साली अमित  यूएसच्या लुसियाना युनिव्हर्सिटीमधून आपली डिग्री घेऊन भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी आधी आपल्या वडिलांचं दुकान सांभाळलं आणि नंतर वर्धान स्नॅक्स कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. वर्धानमध्ये त्यांना मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनच चांगलं नॉलेज मिळालं होत. २००१ पर्यंत यांनी तिथं नोकरी केली. पण अमित यांना आता स्वतःच काही तरी सुरु करायचं असं डोक्यात होत.

यासाठी अमित यांनी एका केमिकल कंपनीपासून सुरुवात केली. त्यांना या कंपनीकडून खूप होप्स होत्या, पण काही वर्षांच्या आत ही कंपनी एकदम फ्लॉप गेली. यांनतर त्यांनी सॅप इन्स्टिट्यूट सुरु केलं, पण ते सुद्धा फेल गेलं. या सगळ्या गोष्टींमुळं अमित त्यांच्यावर जवळपास जवळपास ६- ७ कोटींचं कर्ज झालं. ते फेडायचं म्हणून अमित यांनी आपली जी काही सेविंग होती ती आणि काही सोर्सेसची मदत घेतली. हे ६ कोटींचं कर्ज फेडलं खरं, पण अमित यांच्याकडं काहीचं पैसे शिल्लक नव्हते.

असं म्हणतात ना पैसा नसला कि माणसाला सुद्धा किम्मत राहत नाही. असेच दिवस अमित यांच्यावर आले. मार्केटमध्ये अमित यांची जी काही व्हॅल्यू होती, ती सुद्धा हळू-हळू कमी होत गेली. पण अमित शांत बसणाऱ्यातले नव्हते. पुन्हा उठून नवीन सुरवात करायची हे त्यांनी पक्क ठरवलेलं आणि यातूनच कल्पना सुचली ती स्नॅक्स कंपनीची.

आता स्नॅक्स कंपनी सुरु करायचं ठरलं, पण कर्जापायी अख्खी सेविंग गेलेली त्यामुळं पैशाचा मोठा प्रश्न होता. अशात अमित यांनी आपला मोठा अपूर्व कुमत आणि त्यांचा मित्र अरविंद मेहता यांना आपली स्नॅक्स कंपनीची कन्सेप्ट सांगितली. त्या दोघांना सुद्धा अमित यांची ही कन्सेप्ट पटली आणि त्यांनी फंड गोळा करायला सुरुवात केली.

या तिघांनी मिळून आपल्या कंपनीसाठी  जवळपास १५ लाख रुपयांची रक्कम गोळा केली, जिला नाव देण्यात आलं यलो डायमंड. २००२ साली मध्यप्रदेशाच्या इंदोरमध्ये  छोट्या जागेवर त्यांनी ही कंपनी सुरु केली.  कंपनीतून पाहिलं प्रोडक्ट तयार झालं ते चीज बॉल आणि रिंग्स.

आता १५ लाखात एखाद्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग करणं अवघड काम, पण इथे अमित यांचं मार्केटिंगच नॉलेज कामी आलं. आपल्या प्रोडक्टच्या विक्रीसाठी अमित यांनी काही मार्केटिंग स्टॅटेजी वापरल्या.

त्यातली पहिली म्हणजे व्हाईट लेबल सेलिंग, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आऊटसोर्सिंग. म्हणजे कोणा दुसऱ्या फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून ते आपलं प्रोडक्ट तयार करून घ्यायचे आणि आपल्या कंपनीच्या लेबलखाली ते इंदोर आणि आसपासच्या भागात विकायचे.

या गोष्टीचा फायदा असा झाला की, कमी फंड असल्यामुळं कंपनीच्या मशीनरीचा  खर्च वाचला, स्टाफला खर्च वाचला आणि जास्तीच्या जागेचा सुद्धा. आणि दुप्पट प्रॉफिट व्हायला लागलं. म्हणजे पहिल्याच वर्षी कंपनीने जे १५ लाख इन्व्हेस्ट केले होते, त्याच्या जवळपास दुप्पट म्हणजे २७ कोटी रुपये प्रॉफिट कमवलं. दुसऱ्या वर्षी हेच प्रॉफिट १ कोटींच्या घरात गेलं, त्याच्या पुढच्या वर्षी ७ कोटी… आणि त्यांनतर कंपनीच्या ग्रोथचा जो आलेख वाढत गेला तो वाढतचं गेला.

आता मार्केटमध्ये प्रताप स्नॅक्सला तोड देणारे आधीचं कित्येक ब्रँड होतं, त्यातले अर्धे निम्मे तर फॉरेन ब्रँड. पण अशावेळी भारतीय असणाऱ्या अमित यांनी भारतीयांच्या डोक्यानं  विचार केला आणि आपल्या प्रोडक्टची क्वालिटी प्लस कॉन्टिटी वाढवली.

म्हणजे, आपण जेव्हा एखादं चिप्स किंवा कुरकुरेचं  पाकिट विकत घेतो तेव्हा ते असतं १०-२० रुपयाला. ते दिसायला तर भरलेलं दिसतं पण खायचं सामान अर्ध सुद्धा नसतं. त्यामुळं ते घेताना आपणं नाही म्हंटल तरी विचार हा करतोचं.

हिचं गोष्ट अमित यांनी स्ट्रॅटेजी म्हणून वापरली.त्यांनी मार्केट सर्वे केला कि कोणती कंपनी किती पैशांमध्ये किती ग्रॅम स्नॅक्स एका पाकिटात देते. तेव्हा समोर आलं कि बाकीच्या बड्या  कंपन्या ५ रुपयात तर स्नॅक्स देत नाही, पण ज्या देतात त्यात २२ ग्रॅम देतात. तेव्हा माहित यांनी आपल्या स्नॅक्सच्या ५ पाकिटात ३० ग्रॅम द्यायला सुरवात केली. म्हणजे भारतीयांना पाहिजे तशी क्वालिटी, क्वांटिटी आणि मनी या तिन्ही गोष्टी मेंटेंन केल्या. त्यामुळे प्रताप स्नॅक्सची विक्री दिवसेंदिवस वाढत गेली. 

याच काळात ग्राहकांची मागणी पाहता कंपनीने वेगवेगळे स्नॅक्स बाजारात उतरवले. मार्केटमध्ये आधीच बादशाह असलेल्या कुरकुरे होत, पण याला तोड म्हणून कंपनीने चुलबुले नावाचं प्रोडक्ट आणलं आणि ते सुद्धा अफलातून चाललं.  यासोबतच वेगवगेळ्या प्रकारचे ९ फ्लेवरचे चिप्स, रिंग्स, फप्स, पेलट स्नॅक्स, यम पाय असे अनेक प्रोडक्ट आणले. 

यात सुद्धा स्ट्रॅटेजी अशी कि, कंपनीने टार्गेट ग्रुप ठेवला लहान मुलं. कारण लहान मुलांना एखादी गोष्ट आवडली कि ते आपल्या आई – वडिलांना कसाही हट्ट करून ती गोष्ट मागून घेतातचं.  त्यांच्यासाठी कंपनीने रिंग्समध्ये छोटे- छोटे टॉय द्यायला सुरुवात केली. म्हणजे लहान मुलं टॉयच्या नादाने का होईना आपलं स्नॅक्स विकत घेतील.  एकूण काय कंपनीने लहान मुलांनाच आपलं ब्रँड अँबॅसिटर बनवलं. 

या सगळ्याच गोष्टींमुळे कंपनी दिवसेंदिवस प्रॉफिटमध्ये होती. कंपनीत बाहेरची कुठलीचं इन्व्हेस्टमेंट नव्हती, काम सुरु होत ते फक्त प्रॉफिटवर. याच दरम्यान २००९ ला  सिक्वायर कॅपिटल नावाच्या कंपनीने अमित यांना एक ऑफर दिली. ज्यात तब्बल ३० डॉलरची इन्व्हेस्टमेंट आणि टॉपचं मॅनेजमेंट स्ट्रक्चर सुद्धा होतं. या ऑफरमुळं प्रताप स्नॅक्सला ५ पटीनं प्रॉफिट मिळालं होत.

पण अमित आणि त्यांच्या पार्टनरने मिळवून ठरवलं कि, जोपर्यंत आपल्याला गरज वाटत नाही तोपर्यंत आपण दुसरी कुठलचं इन्वेस्टमध्ये ऑफर घ्यायची नाही. २०११ पर्यंत कंपनी आपल्या स्केलवरचं काम करत होती, पण आता अमित यांना आता आपला बिजनेस मोठ्या स्केलवर न्यायचा होता. त्यामुळं अमित यांनी सिक्वायर कॅपिटल कंपनीची ऑफर स्वीकारली.

कंपनीला ही ऑफर फायद्याची ठरली आणि ४ ते ५ वर्षातचं कंपनीला दुप्पट प्रॉफिट मिळालं. महत्वाचं म्हणजे कंपनी तोपर्यंत कुठल्याही मोठ्या स्केलवर जाहिरात करत नव्हती. पण २०१६ ला प्रताप स्नॅक्सने सलमान खानला आपलं ब्रँड अँबॅसिटर बनवलं. त्यावेळी नुकताच सलमान खानचा भाईजान चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे या जाहिरातीत सलमानसोबत चित्रपटातील लीड कॅरॅक्टर मुन्नी हिलासुद्धा जाहिरातीत घेतलं गेलं.

पण प्रताप स्नॅक्सच्या मार्केटिंग मध्ये सगळ्यात भारी स्टॅटेजी ठरली ते म्हणजे जिंगल्स मार्केटिंग. जसं कि चुलबुलसाठी “स्नॅक्स के चुलबुल पांडे हैं”, स्कुपसाठी “मजेदार स्कुप के स्वाद के साथ बन जाये हर बात”,  चोको व्हॅनिला केकसाठी “चोको और व्हॅनिला साथ आये दिल झूम जाये”, ‘रिंग्स साठी “टॉय के साथ खेळते रहो और रिंग्स खाते रहो” असे बरेच काही..  

याचा फायदा असा होतो कि, जिंगल्स असणाऱ्या प्रोडक्टकडे ग्राहक लगेच वळतात. त्यांच्या तोंडात ते जिंगल्स सतत येत राहतात, आणि सोशल मीडियावर सुद्धा लोक त्याच्यावर मिम्स बनवून आपोआप मार्केटिंग बनवतात. 

आणि या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळं आज प्रताप स्नॅक्स एक सक्सेफुल ब्रँड बनलाय. आज जर बघितलं तर कंपनीचे ५ मॅन्युफॅक्चर प्लांट,  ३५०० पेक्षा जास्त डिस्ट्रिब्युटर आहेत जे २८ राज्यांत काम करतायेत. या मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या जोरावरचं भारतातल्या ५ टॉपच्या स्नॅक्स कंपन्यांमध्ये प्रताप स्नॅक्सने एन्ट्री मारलीये आणि कंपनीची उलाढाल १००० कोटींच्या वर आहे. 

 हे हि वाच भिडू :

 

The post फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: