कापडणीस मर्डर मिस्ट्री प्रकरणाचे गुढ उकलले; समोर आली धक्कादायक माहिती

March 10, 2022 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नाशिकः माजी कुलसचिवांसह त्यांच्या डॉक्टर मुलाचा खून केल्याप्रकरणी आणखी तीन संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने चौदा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात फरार संशयित प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांना औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले. तर, मुख्य संशयित राहुल जगताप याच्यासोबत कायम 'ओली पार्टी' करून त्याच्याच हॉटेलात कापडणीसांच्या खुनासह मृतदेहाची विल्हेवाट लावणे आणि मालमत्ता हडपण्याचा कट शिजल्याची माहिती आता पुढे आली आहे. पंडित कॉलनीतील रहिवाशी माजी कुलसचिव नानासाहेब आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांचा खून झाल्याची उकल पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला केली. या गुन्ह्यात संशयित राहुल जगतापला अटक करण्यात आली. सध्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जगतापने पोलिस कोठडीत असताना साथीदारांची माहिती दिली. पोलिसांच्या तीन पथकांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. मंगळवारी (दि. ८) सायंकाळी नांदेडहून औरंगाबादमध्ये एक संशयित आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी एक पथक औरंगाबादकडे पाठविले. पथकाने संशयित हेमके याला ताब्यात घेतले. उर्वरित दोघे वाळुंजमध्ये असल्याचे समजले. तेथे भाड्याने घर घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. तेव्हाच संशयित शिरसाठ आणि मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी (दि.९) न्यायालयात हजर करण्यात आले. - कापडणीस खूनात जगताप, हेमके, शिरसाठ व मोरे यांचा सक्रीय सहभाग - मुख्य संशयित जगताप आणि शिरसाठ - खूनानंतर हेमकेला १२ लाख रूपये - इतर दोघांनाही मिळाले पैसे - जगतापच्या चौकशीवेळी तिघे फरार - अटकपूर्व जामीनासाठीही केले होते प्रयत्न - संशयितांनी इंदौरला पळून जाण्याचा प्रयत्न केला - तिथे शिरसाठच्या भावाकडे राहणार होते - संशयित हेमकेचा भाऊ खूनाच्या गुन्ह्यातील संशयित शिरसाठ राहुलचा वर्गमित्र संशयित राहुल आणि शिरसाठ हे दोघे बालपणाचे वर्गमित्र आहेत. दोघांचे वडील माजी सैनिक आहेत. शिरसाठच्या अडचणी वाढल्या तेव्हा, जगतापच्या हॉटेलात मॅनेजर म्हणून काम पाहण्यास त्याने सुरुवात केली. अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी चौघांनी मिळून कापडणीस यांच्या खुनाचा कट रचला. संशयित हेमके हा फेब्रिकेशन काम करतो. कापडणीसांच्या सावरकरनगरातील बंगल्याला महापालिकेची नोटीस मिळाल्यावर हेमकेमार्फत तेथे कुंपण उभारण्यात आले. त्यावेळी त्यांनी तिथल्या वॉचमनला हाकलून लावले. तर, खुनानंतर सर्व संशयित २९ डिसेंबर रोजी रत्नागिरीत पार्टीसाठी गेले. त्यानंतर सहा दिवसांनी त्यांनी मालमत्तेसंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली. अमितचा खून घरातच नानासाहेबांना घरातून बाहेर नेत चौघांनी मिळून मारले. तर, अमितचा खून मात्र राहत्या घरातच केल्याची माहिती पुढे येत आहे. अमितचा खून केल्यानंतर चौघे संशयित त्र्यंबकेश्वरच्या दिशेने गेले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण, योग्य जागा मिळत नसल्याने त्यांनी थेट राजुरा गाठले. संशयित जगतापने चौदा लाख रुपये जवळच्या मैत्रिणीला दिल्याचीही माहिती पुढे येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: