मुंबईतील दादरमध्ये बुरखाधारी चोर!; तपासात 'ही' धक्कादायक माहिती उघड

February 15, 2022 0 Comments

मुंबई: सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसू नये, पोलिसांना ओळखता येऊ नये यासाठी बुरखा आणि स्त्रियांचे कपडे परिधान करून चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोराला मधील पोलिसांनी अटक केली. असे या चोराचे नाव असून त्याने दादर येथील सोने व्यापाऱ्याच्या कार्यालयातून १५ लाखांचे दागिने आणि रोख रकमेची चोरी केली होती. ( ) वाचा : दादरच्या या इमारतीच्या १४ व्या मजल्यावर सोनेव्यापारी जिग्नेश मेहता यांचे कार्यालय आहे. २९ जानेवारी रोजी बाथरूमच्या काचा काढून त्यांच्या कार्यलयातील ८ लाख १२ हजारांचे साडेबारा किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि सात लाख रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली. दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर मेहता यांनी येथे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सागर शिवलकर, उपनिरीक्षक प्रमोद अहिरे, शरद काकड, तांबोळी यांच्यासह पोलिसांच्या पथकाने या घरफोडीचा तपास सुरू केला. मेहता यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही रेकॉर्डचा डीव्हीआर चोराने काढून नेला होता. पोलिसांनी इमारतीमधील आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले त्यावेळी एक व्यक्ती बुरखा आणि स्त्रियांप्रमाणे कपडे परिधान करून आत शिरत असल्याचे दिसले. फुटेजमध्ये या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. वाचा : पोलिसांनी वारंवार फुटेजची बारकाईने तपासणी केली. इतकेच नाही तर सलग दहा दिवस दादर, माटुंगा, सायन, कुर्ला आणि पनवेल या परिसरातील सुमारे १३० ते १४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली. फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चाल आणि देहबोली तसेच पनवेलपर्यंत मिळालेले सीसीटीव्ही फुटेज यावरून पोलिसांनी बलवंत गुप्ता या चोराला शोधून काढले. त्याच्याकडून आठ किलोचे दागिने आणि पाच लाखाची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. गुप्ता याने घाटकोपमध्येही अशाच प्रकारे ५ लाखाची चोरी केली होती. वाचा :


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: