सचिन वाझे कुणाला वाचवतोय?; चौकशी आयोगाचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण

February 15, 2022 0 Comments

मुंबई: ‘ ( ) याने आयोगासमोर दिलेली साक्ष आणि त्यानंतर उलटतपासणीत दिलेली उत्तरे ही अत्यंत विचारपूर्वक दिली होती. तो कोणत्याही दबावाखाली दिसत नव्हता. १४ डिसेंबर २०२१ रोजीच्या साक्षीनंतर २२ डिसेंबर २०२१ रोजीच्या पुढील उलटतपासणीपूर्वी त्याने साक्ष पूर्ण वाचून घेतली होती. तशा संमतीनंतरच त्याची उलटतपासणी झाली. त्यानंतर इतक्या कालावधीनंतर आता तो अचानक त्याविषयी घुमजाव करू पाहत आहे. त्यावरून कोणाला तरी वाचवण्याच्या उद्देशाने त्याचे हे प्रयत्न असल्याचे दिसते’, असे निरीक्षण निवृत्त न्यायमूर्ती यांच्या एक सदस्यीय आयोगाने आपल्या आदेशात नोंदवले आहे. ( ) वाचा : माजी आयुक्त यांनी माजी गृहमंत्री यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने हा चौकशी आयोग नेमला आहे. ‘देशमुख किंवा त्यांच्या सहायकांनी माझ्याकडे पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. मी त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे दिले नाहीत. तसेच मुंबई महानगरातील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून मी कोणतेही पैसे गोळा केले नाहीत’, असे वाझेने आयोगासमोर साक्ष व उलटतपासणीत स्पष्ट केले होते. ते म्हणणे मागे घेण्याची परवानगी मागणारा अर्ज वाझेने केला होता. मात्र, ‘सत्य हे वाझेच्या लहरीपणावर हेलकावे घेत असल्याचे दिसत आहे. त्याने साक्ष व उलटतपासणीतील उत्तर देताना अत्यंत विचारपूर्वक दिली होती. शिवाय त्या नोंदीची तपासणीही त्याने नियमाप्रमाणे स्वत:च करून घेतली होती. त्याच्यावर आयोगाला कधीही कोणताही दबाव असल्याचे दिसले नाही. सर्व प्रश्नांना त्याने शांतपणे व विचारपूर्वक उत्तरे दिली. शिवाय त्यानंतरही कधीच त्याने दबावाचा उल्लेख आयोगासमोर केला नाही आणि आता इतक्या दिवसांनी अचानक हा अर्ज केला आहे. एकंदरीत सर्व लक्षात घेता कोणाला तरी वाचवण्याच्या प्रयत्नातूनच त्याने हे विचारपूर्वक पाऊल टाकल्याचे दिसत आहे’, असे निरीक्षण न्या. चांदिवाल यांनी आदेशात नोंदवून त्याचा अर्ज नुकताच फेटाळून लावला. वाचा : वाझेने परमबीरचे वकीलपत्र घेतलेले नाही! ‘सचिन वाझेने काही परमबीर सिंग यांचे वकीलपत्र घेतलेले नाही, हे नमूद करायला हवे. कारण वाझेचा अर्ज व प्रतिज्ञापत्र वाचल्यानंतर तसे दिसते. आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक खोट्या गुन्ह्यांमध्ये परमबीर यांनाही गोवण्यात आले असल्याचे त्याने म्हटले आहे’, असे निरीक्षणही आयोगाने आदेशात नोंदवले आहे. वाचा :


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: