कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे राज्य सरकार सतर्क,गृहमंत्र्यांची जनतेला 'ही' विनंती

February 09, 2022 0 Comments

मुंबई: कर्नाटकातील एका शाळेत घालण्यावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे सुरू झाले. राज्यात मालेगाव आणि बीडमध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटलेले दिसले. या घटनांमुळे सतर्क झाले असून गृहमंत्री यांनी राज्यातील जनतेला धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य किंवा कृती टाळण्याची विनंती केली आहे. ( home minister urges the public to refrain from acts that create religious bitterness) हिजाब प्रकरणी कर्नाटकात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कर्नाटकातील प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटल्याचे स्पष्ट होताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृह विभागातील अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्विट करत जनतेला ही विनंती केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, 'कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दु्र्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.' क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटले असून येथे फारूखी लुकमान नावाच्या विद्यार्थी नेत्याने एक बॅनर लावले आहे. 'पहले हिजाब, फिर किताब.. हर किमती चीज पर्दे में होती है', असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे. या बॅनरमुळे बीडमध्ये चर्चा सुरू झाली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: