औरंगाबादने वाढवले टेन्शन! जिल्ह्यात गेल्या सात दिवसात वाढले रुग्ण

January 08, 2022 0 Comments

औरंगाबादः देशासह राज्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेत भर पाडणारी आहे. कारण गेल्या सात दिवसात औरंगाबाद जिल्ह्यात ६३२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यातील गेल्या चार दिवसात ५३४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. () दुसरी लाट ओसरल्यावर पहिल्यांदाच शुक्रवारी औरंगाबादमध्ये तब्बल १८३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ज्यात मनपा हद्दीत १५१ रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील ३२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण २८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून ५२७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कालचा आकडा धडकी भरवणारा असून गेल्या चार दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरी पार करतांना पाहायला मिळत आहे. वाचाः डिसेंबर महिन्यात दोन आकडी असणारी रुग्ण संख्या जानेवारीच्या सुरवातीलाच तीन आकडी झाली आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा खडबडून जागं झालं असून वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. वेळेप्रसंगी अनेक कठोर निर्णय सुद्धा घेतले जात आहे. पण असे असताना नागरिक करोनाच्या नियमांना पायदळी तुडवताना पाहायला मिळत आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी होणारी गर्दी अजूनही कमी व्हायला तयार नसल्याचे सुध्दा पाहायला मिळत आहे. वाचाः अशी वाढली रुग्ण संख्या... ०१ जानेवारी : २६ रुग्ण ०२ जानेवारी : ३५ रुग्ण ०३ जानेवारी : ३७ रुग्ण ०४ जानेवारी : १०३ रुग्ण ०५ जानेवारी : १२० रुग्ण ०६ जानेवारी : १२८ रुग्ण ०७ जानेवारी : १८३ रुग्ण वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: