जैशच्या टार्गेटवर संघ, रेशीमबाग स्मृतिस्थळाची रेकी; पाकमध्ये शिजला कट?

January 08, 2022 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'चेहरा' अशी ओळख असलेला रेशीमबागेतील स्मृती मंदीर परिसर दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. हल्ल्याच्या नियोजनासाठी स्मृती मंदीर परिसराची छायाचित्रे काढून 'रेकी' करणाऱ्या एका संशयित दहशतवाद्याला जम्मू-काश्मिरातील अवंतीपुरा जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. हा संशयित दहशतवादी या पाकस्थित दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी गुरूवारी नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या समाधी आहेत. यापूर्वी, १ जून २००६ रोजी महालातील संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे तो निष्फळ ठरला होता. त्यानंतर महाल आणि या दोन्ही ठिकाणांवरील संघ कार्यालये कायम सुरक्षेच्या वेढ्यात असतात. आता जैश-ए-महंमदच्या संशयित दहशतवाद्याने रेशीमबागसह नागपुरातील इतर काही संवेदनशील स्थानांचीही रेकी केल्याचे स्पष्ट झाल्याने, सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. या घटनेनंतर आता पोलिसांनी संघाशी निगडीत सर्व महत्त्वाची ठिकाणी 'नो फोटोग्राफी झोन' घोषित केला आहे. येथे छायाचित्रीकरण केल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोन महिन्यांपूर्वी नागपूरला भेट विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २६ वर्षीय युवक काश्मिरातील रहिवासी आहे. जैशच्या एका कुख्यात ऑपरेशनल कमांडरच्या नजरेत तो आला व त्याने या युवकाला संघटनेत भरती केले. काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे जिवंत ग्रेनेड आढळून आल्याने काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली होती. चौकशीदरम्यान सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी तो नागपुरात जाऊन 'रेकी' केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. 'मी प्रथम महालातील संघ मुख्यालय व आजूबाजूच्या परिसराची टेहळणी केली. त्यानंतर स्मृती मंदीर परिसरात जाऊन काही छायाचित्रे काढली व वरिष्ठांना पाठवली. ती स्पष्ट नसल्याने त्याच्या वरिष्ठांनी आणखी जवळ जाऊन छायाचित्रे काढण्यास सांगितले. मात्र, तिथे मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने मी धोका पत्करला नाही,' असे या दहशतवाद्याने पोलिसांना सांगितले. गुन्हे उपायुक्तांचा काश्मीर दौरा या दहाशतवाद्यावर गुरूवारी नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलम १८,२०, ३८ आणि ३९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कलमे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी केलेल्या कृत्यासाठी दाखल केली जातात. नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित तातडीने काश्मीरला जाऊन त्याची चौकशी करून आल्याचे कळते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: