खासगी लॅबला नोटीस, चाचणी न केल्याने परवानगी रद्द करण्याचा इशारा

January 15, 2022 0 Comments

औरंगाबाद : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त करोना चाचण्या व्हाव्यात या उद्देशाने महापालिकेने शहरातील ३९ खासगी लॅबला अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. यापैकी पंधरा लॅब चालकांनी आतापर्यंत एकही चाचणी केली नसल्याचे निदर्शनास आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने या पंधरा लॅबला नोटीस बजावली आहे. करोना चाचणी करण्याची परवानगी रद्द का करण्यात येऊ नये याचे उत्तर द्या असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त लॅबमधून अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी करण्याची मान्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. या विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील ३९ खासगी लॅबला परवानगी दिली. करोना चाचणीसाठीचे शुल्कदेखील निश्चित करुन दिले. परंतु परवानगी घेतल्यानंतरही पंधरा लॅब चालकांनी एकही करोना चाचणी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या लॅब चालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. नोटीस बजावण्यात आलेल्या लॅबमध्ये एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी पुंडलिकनगर, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल, अमृत पॅथालॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम, युनिसेफ पॅथालॉजी लॅब भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-२ या लॅबचा समावेश आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: