३१ डिसेंबरला सुरू होता बारमध्ये धक्कादायक प्रकार; पोलिसांनी केली धडक कारवाई

January 02, 2022 0 Comments

उस्मानाबादः नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीसांनी दुसरी मोठी कारवाई केली असून उस्मानाबाद जिल्हयातील गौरी कला केंद्रावर धाड मारली असुन २७ नृत्यांगणासह ३६ ग्राहकांवर कारवाई केली आहे. या पूर्वी तुळजापुर येथील हंगरगा पाटी जवळील गजगा डान्सबारवर कारवाई करत २४ बारबाला व ग्राहकासह ९४ लोकांवर कारवाई करत लाखो रुपयाचा मद्य साठा जप्त केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे वडगाव शिवारात रात्रीची गस्त घालत असताना नियमाचा भंग केल्याचे दिसुन आल्यानंतर हि कारवाई केली आहे. उस्मानाबाद जिल्हयात ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई आहे. जिल्हयात दोन दिवसात करोनाचे ३५ रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच, जिल्ह्यात ५ ओमिक्रॉन रुग्ण आढळुन आले होते. त्या पैकी ३ ओमिक्रॉनचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणुन जिल्हा प्रशासनाने रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध घातले आहेत, असे असताना सुध्दा गौरी कला केंद्राचे मालक मनसुर नुर शेख रा. लातुर यांनी कला केंद्रावर लोकांना एकत्र करत २७ नृत्यांगणासह ग्राहकांना नृत्यांगणा मार्फत अश्लील हावभाव करताना आढळुन आहे. वाचाः जमलेल्या ग्राहकांना सुरज राजेश निकाळजे रा.जामखेड हे मद्यपुरवठा करताना आढळुन आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब यांच्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक अमोल मालुसरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या तक्रारी वरुन येरमाळा पोलीस स्टेशनला भा.द,वि कलम १८८,२६८,२९४,३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३,१३१ सह साथीचे रोग अधिनियम कलम ३ महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम ६५ ई अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: