Suresh Pujari Arrested: कुख्यात गुंड सुरेश पुजारीला अटक; १० दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

December 16, 2021 0 Comments

ठाणे: कुख्यात गुंड याला फिलिपिन्स येथे अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एटीएसच्या ताब्यात दिले. त्यानंतर एटीएसने त्याला आज ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलीपिन्स येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. कल्याण खंडणी प्रकरणी एटीएसने सुरेश पुजारी याला दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेऊन आज त्याला ठाणे न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सुरेश पुजारीला २५ डिसेंबरपर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. क्लिक करा आणि वाचा- सुरेश पुजारी याच्यावर कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या अंतर्गत धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल होता. १९ जुलै २०२१ रोजी सुरेश पुजारी याने के के वाईन्सचे मालक रोहित जेठाणी आणि त्यांचा भावाला धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी जेठाणी कुटुंबीयांनी ठाणे एटीएसमध्ये धाव घेत तक्रार केली होती. खंडणी आणि धमकावणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे सुरेश पुजारी याच्यावर याआधी देखील दाखल आहेत. क्लिक करा आणि वाचा- कल्याण के के वाईन्स खंडणी प्रकरणात सुरेश पुजारी याच्यासोबत आणखी कोण सहभागी होते? आणि सुरेश पुजारी याने आणखी किती लोकांकडून खंडणी मागितली? याचा तपास एटीएस करणार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: