रुपाली ठोंबरे यांनी मनसेला का ठोकला रामराम? खरे कारण आले समोर

December 16, 2021 , 0 Comments

नेत्या रूपालीताई ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहून राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या मनसेवर नाराज असल्याच्या दिसत होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली होती.

त्यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. रूपाली ठोंबरेंनी एक पत्र लिहून राजीनामा दिला आहे. एकीकडे पुणे महापालिकेसाठी मनसे तयारी करत असताना रूपाली ठोंबरेंनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपुर्वीच रूपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराजी व्यक्त केली होती.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या रुपाली ठोंबरे यांनी अचानक हा निर्णय घेतल्यामुळे लोक वेगवेगळे तर्कवितर्क लावत होते. मात्र यामागचे खरे कारण समोर आले आहे. काही कार्यकर्त्यांच्या त्रासामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

मनसेचे हजारो कार्यकर्ते निष्ठेने काम करत आहेत. त्यांना सामावून घेणे गरजेचे आहे. गेली १४ वर्षे मी मनसेत काम करत होते. माझ्या राजीनाम्याने जेवढा इतरांना धक्का बसला, तितकाच पक्षाच्या कार्यपद्धतीत झालेला बदल माझ्यासाठी धक्कादायक होता, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

मला पक्ष सोडण्याची वेळ काही लोकांमुळे आली आहे आणि मी ती स्वीकारली आहे. काही महिला सगळ्या गोष्टी सहन करुन काम करत असतात, तर काही महिला या संन्यास घेतात. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी परिस्थिती बदल होण्याची वाट पाहिली. पण तसे काही झाले नाही, त्यामुळे मी माझा वेगळा निर्णय घेतला. १४ वर्षे हा काही छोटा काळ नव्हता, काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला आहे, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

यावेळी कोणत्या कार्यकर्त्याने तुम्हाला त्रास दिला होता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावरही त्यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचे नाव सांग नकार दिला आहे. त्या म्हणाल्या, त्यांची नावे जगजाहीर आहे. मला वाटतं पक्षानं याकडं लक्ष द्यावं, असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

रुपाली ठोंबरे या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या संपर्कात आहे. त्यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, आपल्याकडं भरपूर पक्ष आहे. घूसमट त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी हे केलं आहे, पुढे काय होईल याबाबत लवकरच कळेल.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या बड्या नेत्याची नात होणार कतरिनाची जाऊबाई; कतरीनानेच शेअर केले फोटो
धुमधडाक्यात पार पडला जेठालालच्या मुलीचा विवाहसोहळा; पहा सोहळ्याचे सुंदर फोटो..
सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर राज्य सरकार लागले कामाला; OBC आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: