ST Strike News Today : एसटी कर्मचाऱ्यांनी गमावली संधी, दीड हजार एसटी कर्मचारी अद्याप संपावर

December 27, 2021 0 Comments

औरंगाबाद : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे. या मागणीसाठी जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रशासनाने दिलेल्या सवलतीनंतर आतापर्यंत कामावर आठशे कर्मचारी हजर झाले असून, अजूनही दीड हजारांपेक्षा जास्त कर्मचारी संपावर आहेत. (Aurangabad news today one and a half thousand ST workers still on strike) एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे. राज्यभरातील एसटी बस बंद असल्याने नागरिकांना पर्यायी खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही खासगी वाहने किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या नावाखाली चालणाऱ्या वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आधी पगार वाढविण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर कारवाईचा बडगा दाखविण्यात आला. शिवाय संपाची नोटीस देणाऱ्या संघटनेने संपातून माघार घेतल्यानंतर २३ डिसेंबरपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रशासनाच्या या आवाहनानंतर २३ डिसेंबरपर्यंत विभागात सुमारे ८०० कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. औरंगाबाद विभागात एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास २२०० इतकी आहे. यातून आठशे कर्मचारी हजर झाल्यामुळे दररोज एसटीच्या साध्या बसच्या ५६ चालविण्यात येत आहे. सध्या एसटीचे १४०० कर्मचारी विविध आगारात संपावर असल्याची माहिती समोर आली आहे. १५ जणांना केले बडतर्फ औरंगाबाद विभागात १५७ जणांना निलंबित करण्यात आले होते. यामुळे निलंबनावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १२२ पर्यंत आहे. १२२ मधुन १५ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी बडतर्फ करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. तर आगामी आठवड्यापर्यंत उर्वरित १०७ कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संधी गमावली बडतर्फ कर्मचाऱ्यांबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, ही संधी या कर्मचाऱ्यांनी गमावली आहे. यामुळे आता यानंतर बडतर्फी होऊ नये, यासाठी निलंबित कर्मचारी कामावर हजर झाल्यास त्यांच्यावर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. (Aurangabad news today one and a half thousand ST workers still on strike) (Aurangabad news today one and a half thousand ST workers still on strike)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: