ओमिक्रॉननंतर 'या' भयंकर आजाराने चिंता वाढवली, १० नवे रुग्ण समोर; रक्ताची गरज वाढणार

December 27, 2021 0 Comments

औरंगाबाद : केवळ अडीच महिन्यांत थॅलेसेमियाचे दहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत व हे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण रोखण्यासाठीच थॅलेसेमिया सोसायटीच्या श्री सत्यसाई रक्तपेढीच्या वतीने शहर परिसरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात आहे. तसेच रक्तपेढी सुरू झाल्यानंतर अडीच महिन्यांत ७२५ दात्यांनी रक्तदान केले, तर सुमारे एक हजार रुग्णांना विविध रक्तघटक देण्यात आल्याची माहिती रक्तपेढीमार्फत रविवारी (२६ डिसेंबर) पत्रकार परिषदेत देण्यात आली. (thalassemia new 10 cases detected in Aurangabad in the last two and a half months ) थॅलेसेमियाच्या रुग्णांना विविध प्रकारे सेवा देता यावी व त्यांचे प्रश्न सोडवता यावेत, या उद्देशाने २०१३ मध्ये औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी स्थापन झाली. या सोसायटीमध्ये आतापर्यंत २५० थॅलेसेमिया मेजर रुग्णांची नोंद झाली आहे व सर्व नोंदणीकृत रुग्णांना सोसायटीमार्फत मोफत उपचार दिले जातात. यापैकी १७५ रुग्ण नियमितपणे उपचार घेतात. सर्वच रुग्णांना दर २१ दिवसांनी एका रक्ताच्या बॅगची गरज असते, तर ४४ रुग्णांना दोन बॅग लागतात. या विविध बाबींची गरज लक्षात घेऊनच सोसायटीमार्फत अडीच महिन्यांपूर्वी सिडको एन-पाच परिसरात श्री सत्यसाई ब्लड सेंटर सुरू करण्यात आले. लायन्स क्लब आयकॉन, महिंद्रा फायनान्स, महावीर इंटरनॅशनल तसेच अभय सहा यांचा रक्तपेढीला हातभार लागला. या रक्तपेढीमार्फत थॅलेसेमिया नसलेल्यांनाही रक्त व रक्तघटक दिले जातात आणि यापुढे थॅलेसेमियाचा नवीन रुग्ण जन्माला येऊ नये, यासाठी आता रक्तपेढीमार्फत विविधांगी समाज प्रबोधनात्मक उपक्रमही राबवले जात आहेत. यानिमित्ताने थॅलेसेमिया आजाराची माहिती, हा आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, निदान-उपचाराची विस्तृत माहिती ही देवगिरी महाविद्यालय, श्री छत्रपती महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, सीएसएमएसची महाविद्यालये, मौलाना आझाद महाविद्यालय, डॉ. रफिक झकेरिया महाविद्यालय, ईकरा महिला महाविद्यालय, औरंगाबाद पब्लिक स्कूल, जिया उल उलाम स्कूल आदी अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी-शिक्षकांना देण्यात आली आहे, असे रक्तपेढीचे संचालक डॉ. महेंद्रसिंह चौहान, सोसायटीचे सचिव अनिल दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (thalassemia new 10 cases detected in Aurangabad in the last two and a half months ) 'एचपीएलसी'ने वाचते दुष्टचक्र थॅलेसेमिया मायनर असलेल्या पती व पत्नीचे मूल हे थॅलेसेमिया मेजर असू शकते आणि थॅलेसेमिया मेजर अपत्यास आयुष्यभर दर १५ दिवसांनी किंवा महिन्याने रक्त द्यावे लागते. रक्त न मिळाल्यास मूल दगावण्याची शक्यता असते. पुन्हा वारंवार रक्त देण्यातून उद्भवणाऱ्या वैद्यकीय समस्यांवर उपचार करावे लागतात. मात्र 'एचपीएलसी' ही सोपी व कमी खर्चातील चाचणी केल्यास संबंधित व्यक्ती ही थॅलेसेमिया मायनर आहे किंवा नाही, हे खात्रीने कळू शकते आणि पुढील दुष्टचक्र रोखता येऊ शकते. त्यामुळे लग्नाआधी सर्वच युवक-युवतींनी ही चाचणी करुन घ्यावी, असेही आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले. थॅलेसेमिया आजाराची वाढत जाणारी संख्या व उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेऊन दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे. व्यक्ती-संस्था-संघटनांनी रुग्णांना रक्तदानासह दत्तक घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं श्री सत्यसाई रक्तपेढीचे संचालक डॉ. महेंद्रसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. (thalassemia new 10 cases detected in Aurangabad in the last two and a half months ) (thalassemia new 10 cases detected in Aurangabad in the last two and a half months )


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: