डोनाल्ड ट्रंपचे मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या अमरीश त्यागींचा भाजपात प्रवेश, वडील करतात JDU चे नेतृत्व

December 06, 2021 , 0 Comments

जनता दल युनायटेड (जेडीयू)चे राष्ट्रीय सरचिटणीस केसी त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत रविवारी लखनऊमध्ये त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. अमरीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम केले आहे.

निवडणुकीची रणनीती तयार करण्याचे काम करत असल्यामुळे त्यागी चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. अमरीशचे वडील केसी त्यागी जेडीयूमध्ये आहेत. केसी त्यागी नितीश यांच्या जवळचे मानले जातात. अमरीश सांगतात की, कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांमध्ये सहभागी होण्यास मोकळे आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपसमोर कोणताही पक्ष नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, ते स्वतः यूपीची निवडणूक लढवणार की नाही, याचा निर्णय अमरीश त्यागी यांनी पक्षावर सोडला आहे. ते म्हणाले की त्यांचे वडील केसी त्यागी हे एनडीएच्या घटक पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचा भाजपशी नेहमीच संबंध राहिला आहे.

अमरीश त्यागी ओवालिनो बिझनेस इंटेलिजन्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची कंपनी राजकीय पक्षांची रणनीती, मीडिया व्यवस्थापन यासाठी सल्लागार म्हणून काम करते. अमरीश त्यागी यांच्या कंपनीने अमेरिकेच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीसाठी काम केले होते. कंपनीने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी निवडणूक रणनीतीही तयार केली आहे.

अमरीश व्यतिरिक्त सपा आणि भीम आर्मीच्या अनेक नेत्यांनी रविवारी लखनऊमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक प्रचारात भाजप आघाडीवर असल्याचे त्यांचे मत आहे. विरोधी पक्ष त्यांच्या आजूबाजूलाही दिसत नाही. वडिलांची समाजवादी विचारधारा आणि भाजपचे हिंदुत्व यावर ते म्हणाले की, एकाच कुटुंबात वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात.

वडील जेडीयूसाठीच काम करणार असल्याचे अमरीश यांनी स्पष्ट केले. पण आता त्यांच्याकडे यूपीमध्ये भाजपला मजबूत करण्याची जबाबदारी आहे. पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अमरीश यांनी दिली. मुख्यमंत्री योगींनी पुन्हा सत्ता हाती घ्यावी, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ताज्या बातम्या
सावरकरांना कोणताही मराठी माणूस विरोध करू शकत नाही, जो वाद झाला तो दुर्दैवी- शरद पवार
भारताबाहेर निघालेल्या जॅकलिनला विमानतळावरच रोखले, अटक होण्याची शक्यता
कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा- रावसाहेब दानवे
अर्जून-मलायकाचा स्विमींगपूलमधील बोल्ड व्हिडीओ व्हायरल; अर्जूनने मलायकाला मागून दिला जोराचा धक्का   


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: