वानखेडेवर न्यूझीलंडचं पानिपत ! मॅचसह भारताने सिरीजही जिंकली

December 06, 2021 , 0 Comments

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकून मालिका जिंकली. पहिला कसोटी सामना अनिर्णित राखण्यात न्यूझीलंडचा संघ यशस्वी झाला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात संघाला ३७२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारतीय संघाने ही कसोटी मालिका १-० ने जिंकली.

या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंक अग्रवालचे शतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३२५ धावा केल्या. एवढेच नाही तर न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने भारताच्या सर्व फलंदाजांना बाद करत १० विकेट्स आपल्या नावावर केल्या.

मात्र, न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात ६२ धावांत आटोपल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांची निराशा झाली. भारतातर्फे अश्विनने ४ बळी, मोहम्मद सिराजने ३ विकेट, अक्षर पटेलने २ आणि जयंत यादवने एक विकेट घेतली.

पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने मयंक अग्रवालच्या अर्धशतकांच्या जोरावर पुढे खेळ केला, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलच्या ४७-४७ धावा, अक्षर पटेलच्या ४१ धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या ३६ धावा केल्या. भारताने ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला.

या डावात न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ४, तर रचिन रवींद्रने ३ बळी घेतले. अशाप्रकारे एजाज पटेलने सामन्यात १४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. संपूर्ण मॅचदरम्यान केवळ एजाज पटेलच्याच नावाची चर्चा सुरु होती.

न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात फॉलोऑनही वाचवता आला नाही. मात्र, भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करणे योग्य मानले. मयंक अग्रवालचे अर्धशतक, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अक्षर पटेल आणि कर्णधार विराट कोहलीच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ७ गडी गमावून २७६ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने किवी संघासमोर ५४० धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु न्यूझीलंडचा दुसरा डावही १६७ धावांवर गारद झाला. भारताने त्तब्बल ३७२ धावांनी हा सामना जिंकला.

न्यूझीलंडने सामना गमावला
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर १४०/५ पुढे खेळताना न्यूझीलंडला एकूण १६२ धावांवर सहावा धक्का बसला जेव्हा जयंत यादवने रचिन रवींद्रला चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद केले. जास्त वेळ न घेता जयंत यादवने भारताला लवकरच सातवे यश मिळवून दिले. त्याने काईल जेम्सनला खाते न उघडता एलबीडब्ल्यू बाद करत तंबूचा रस्ता धरायला लावला.

भारताला आठवे यशही जयंत यादवने मिळवून दिले, ज्याने टीम साऊथीला शून्यावर बाद केले. मोठा फटका मारण्याच्या नादात साउथी क्लीन बोल्ड झाला. जयंतनेच न्यूझीलंडला ९ वा धक्का दिला. जयंतने विल्यम सोमरव्हिलला मयंक अग्रवालकडे १ धावांवर झेलबाद केले. आर अश्विनने शेवटची विकेट मिळवत भारताचा विजय सुनिश्चित केला.
ताज्या बातम्या
मित्रपक्षाच्या सर्वात मोठ्या नेत्याचा पोरगाच भाजपने फोडला; आज करणार भाजपात प्रवेश
सावरकरांना कोणताही मराठी माणूस विरोध करू शकत नाही, जो वाद झाला तो दुर्दैवी- शरद पवार
भारताबाहेर निघालेल्या जॅकलिनला विमानतळावरच रोखले, अटक होण्याची शक्यता
कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा- रावसाहेब दानवे
अर्जून-मलायकाचा स्विमींगपूलमधील बोल्ड व्हिडीओ व्हायरल; अर्जूनने मलायकाला मागून दिला जोराचा धक्का

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: