मोदी सरकारचे चीनच्या आक्रमकतेसमोर मौन; भाजप नेत्याचा स्वपक्षालाच जोरदार तडाखा

December 10, 2021 , 0 Comments

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत मांडत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते मोदी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. आता त्यांनी चीनवर बोलताना नेहरु सरकारमधील आणि मोदी सरकारमधील फरक सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही वर्षांपासून चीन भारतावर आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. तसेच भारत-चीन बॉर्डरवर सैनिकांमध्ये झटापटीही झाली होती. आता याच्यावर बोलताना सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले आहे, की चीनच्या आक्रमकतेवर मौन बाळगण्यासाठी मोदी सरकारने संवेदनशील धोरण स्वीकारल्याचे म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरूंनी चीनची आक्रमकता लपवण्यासाठी पंचशील धोरण अवलंबून देशाला निराश केले आणि मोदींनी चीनच्या आक्रमकतेवर मौन बाळगण्यासाठी संवेदनशील धोरण स्वीकारले, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातामुळे मृत्यु झाला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की बिपीन रावत त्या अधिकाऱ्यांपैकी होते जे सरकारला न घाबरता चीनबाबत स्पष्टपणे आपले मत व्यक्त करत होते.

हेलिकॉप्टरचा अपघात झाला नसावा आणि त्यांना लक्ष्य करण्यात आले असावे, असे मत बिपीन रावत यांनी व्यक्त केले आहे. सायबर युद्धाची भीती व्यक्त करून त्यांनी या घटनेबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

बिपीन रावत त्या पातळीवरील लष्करातील काही निवडक लोकांपैकी एक होते जे सरकारला घाबरत नव्हते आणि चीन शत्रू आहे असे सांगत होते. चीन हा देशासाठी धोका आहे. चीनने आपल्या हद्दीत प्रवेश केला आहे,त्यामुळे हा अपघात जाणून बूजून केलेला असू शकतो. सायबर वॉरफेअरमध्ये एखादी वस्तू लेझरने पेटवली जाते, तसा याचा अपघात घडवून आणला असावा असे सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मॅडम तुम्ही खासदार असल्याचे भान ठेवा, सेक्सी फोटो शेअर करताना जरा वेळकाळ बघा
“भाजपची भाषणे चला हवा येऊ द्या पेक्षा कमी नसतात, लोकांनी टाळ्या वाजवाव्या एवढंच त्यांना वाटतं”
अखेर मिस्टर अँड मिसेस कौशलच्या लग्नाचे फोटो आले समोर; आयुष्यभरासाठी एक झाले विकी-कतरिना


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: