“माझ्या दहा पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलं आहे, पण राजकारणात येऊन मी चूक केली”
कर्नाटकमध्ये विधान परिषदेची निवडणूकीचे वातावरण आहे. या पण या निवडणूकीत सगळ्यात जास्त चर्चा युसूफ शरीफ या उमेदवाराची आहे. बेंगलोर शहर मतदार संघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आहे. शरीफ हे राज्यातील सर्वांत श्रीमंत राजकारणी असल्याचे समजले जात आहे.
असे असतानाच आता युसूफ शरीफ यांनी राजकारणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी राजकरणात आल्याचा पश्चाताप होत असल्याचेही सांगितले आहे. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील येत होते.
शरीफ हे अब्दधीश आहे. ते सुरुवातीला भंगार व्यवसायिक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती १ हजार ७४४ कोटी रुपये लिहीली होती. पण उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याबाबत राजकीय चर्चांमध्ये चर्चा होऊ लागली. त्यांच्याबद्दल अनेकांना माहित नव्हते, पण जेव्हा त्यांना उमेदवारी दिली त्यानंतर सगळेच हैराण झाले.
शरीफ यांच्याविरोधात भाजपने आघाडी तयार केली आहे. तसेच मंत्री टी सोमशेखर यांनी शरीफ यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहे. शरीफ यांनी त्यांच्या मुलीचा छळ केला असून त्यांच्या पत्नीनेच याबाबत तक्रार केली होती, असा गंभीर आरोप शरीफ यांच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन शरीफ आणि त्यांच्या पत्नीने स्पष्टीकरण दिले आहे. मला आता राजकारणात आल्याचा पश्चाताप होतोय. माझ्या पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती मी कमावून ठेवली आहे. पण या गंभीर आरोपांमुळे मला राजकारणात आल्याचा पश्चाताप होत आहे, असे युसूफ शरीफ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, युसूफ शरीफ हे १४ भावंडांपैकी सर्वात मोठे आणि गरिबीत वाढले. ते रिअल इस्टेटसह अनेक व्यवसाय चालवतात. त्यांची संपत्ती ४ हजार कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे. युसूफ शरीफ भारत गोल्ड माईन्सच्या स्क्रॅप मटेरियल विभागात काम करत होते. त्यांच्या वडिलांची बेकरी होती आणि ते तोट्यात गेल्यावर युसूफ ऑटोचालक झाले. नंतर त्यांनी रद्दीचा व्यवसाय सुरू केला, ज्याने त्यांचे नशीब पुर्णपणे बदलले.
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारचे चीनच्या आक्रमकतेसमोर मौन; भाजप नेत्याचा स्वपक्षालाच जोरदार तडाखा
मॅडम तुम्ही खासदार असल्याचे भान ठेवा, सेक्सी फोटो शेअर करताना जरा वेळकाळ बघा
अखेर मिस्टर अँड मिसेस कौशलच्या लग्नाचे फोटो आले समोर; आयुष्यभरासाठी एक झाले विकी-कतरिना
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: