घरातील व्यक्तीच्या निधनानंतर पॅन कार्ड आधार कार्डचे काय करावे? वाचा, नाहीतर होईल मोठे नुकसान
नवी दिल्ली । कधी अचानकपणे काय घडेल कोणाला सांगता येत नाही. एखाद्या कुटूंबात अचानकपणे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या कुटूंबावर मोठे दुःख कोसळते. सध्या आधार कार्ड आणि पॅनकार्ड ही दोन महत्वाची कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी वापरली जातात. ही कागदपत्रे आता जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत.
यासाठी आता कुटुंबाच्या सदस्यांची जबाबदारी असते की त्यांनी मृत व्यक्तीचे आधार सुरक्षित ठेवावे. याबाबत अनेक नियम आहेत. ते माहिती असणे गरजेचे आहे. कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड निष्क्रिय केले जात नाही. अशी कोणतीही तरतूद नाही.
मृत व्यक्तीचा आधार नंबर रद्द करण्याची कोणतीही व्यवस्था नाही आणि कोणतीही व्यवस्था बनवण्यात आलेली नाही, ज्या अंतर्गत आधार कार्ड परत घेता येऊ शकते. काहीवेळेस याचा गैरवापर देखील केला जाऊ शकतो. यामुळे मृत व्यक्तीचे आधार सांभाळून ठेवावे.
आधार निष्क्रिय करणे किवा मृत्यू प्रमाणपत्रासोबत जोडल्याने आधार कार्डधारकाच्या मृत्यूनंतर याचा गैरवापर रोखता येऊ शकतो. ही एक महत्त्वाची बाब आहे. याबाबत अनेकांना माहिती नाही. यामुळे अनेकांच्या मनात याबाबत प्रश्न आहेत.
पॅन कार्डच्या बाबतीत देखील असेच काहीसे आहे. पॅन कार्ड सरेंडर करता येऊ शकते. यासाठी मृत व्यक्तीचे नाव, पॅन आणि जन्म तारखेसह पॅन कार्ड सरेंडर करण्याचे कारण त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या एक प्रतीसह द्यावे लागेल. ही माहिती देखील महत्त्वाची आहे.
याबाबत प्राप्तीकर विभागाची ई-फाइलिंग वेबसाइट हे जाणून घेईल की तुम्ही हे कशासाठी जमा करत आहात. ही प्रक्रिया अनिवार्य नाही, तुम्हाला वाटले तर पॅनकार्ड तुमच्याकडेच सुरक्षित ठेवू शकता. मात्र ते सुरक्षित ठेवावे लागेल.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: