सावरकरांना कोणताही मराठी माणूस विरोध करू शकत नाही, जो वाद झाला तो दुर्दैवी- शरद पवार
नाशिक येथे ९४ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक दिगग्ज मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे.
शरद पवारांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही भाष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य अजरामर आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चा होऊच शकत नाही. त्यांचे साहित्य अजरामर आहे. वीर सावरकर विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला कोणी विरोध करूच शकत नाही. जो वाद झाला तो दुर्दैवी, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
या संमेलनाच्या परिसराला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. ते अगदी योग्य आहे. अलीकडेच राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो होतो. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहे. मराठी भाषा विषयक अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा करायचे ठरवले आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
समारोप कार्यक्रमात निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नाशिकचे निमंत्रक जयप्रकाश जतेगावकर उपस्थित होते.
दरम्यान, कुसुमाग्रजनगरीत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची घटना घडकी आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला विरोध करण्याचाही अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ला करणं चुकीचा आहे. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे.
महत्वाच्या बातम्या-
साहित्य संमेलनात राडा, संभाजी ब्रिगेडने ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या तोंडावर फेकली शाई
विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार का? कंगना म्हणाली, जे देशहितासाठी काम करत आहेत त्यांचा..
‘माझ्याकडे माझेही पैसै आहेत’, सर्व श्रेय सलमान खानला गेल्याने मेहुणा आयुष शर्मा संतापला
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: