पेट्रोल डिझेलचे नवीन रेट जाहीर, ‘या’ शहरात मिळत आहे ८२ रु लिटरने पेट्रोल
सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज, शनिवार 4 डिसेंबर रोजी इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पेट्रोलचे दर थोडी कमी होतील असे बोलले जात होते. मात्र सध्या मोदी सरकारने जैसे थी परिस्थिती ठेवण्यावर भर दिला आहे. असे असूनही दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपयांवरून ९५.४१ रुपयांवर आली आहे.
दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटरवर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.
लखनऊमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर आहे.
गांधीनगरमध्ये पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लिटर आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रति लिटर आहे.
दररोज 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. केंद्रासह काही राज्यांमध्ये पेट्रोलवरील कर कमी केल्याने दरामध्ये बराच फरक पडल्याचे दिसून येत आहे. मात्र काही राज्यांनी हा दर कमी करण्यास सक्त नकार दिला आहे.
अशा प्रकारे तुम्ही आजचे नवीनबी दर जाणून घेऊ शकता
तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांनी कंगणाला दाखवला हिसका; अभिनेत्री म्हणते त्यांनी मला मारूनच टाकलं असतं
लस घ्या आणि जिंका टीव्ही,फ्रिज अशा वस्तू ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरु आहे भन्नाट ऑफर
ओमिक्रॉनचा खेळ खल्लास! ‘या’ कंपनीने ओमिक्रॉनवर शोधले प्रभावी औषध
मॉलमध्ये नग्न अवस्थेतच गेली अडल्ट मॉडेल, गार्डने धक्का देऊन काढले बाहेर; पहा व्हिडिओ
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: