आधुनिक भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात क्रांती करण्याचं श्रेय एका मराठी माणसाला जातं

December 31, 2021 , 0 Comments

भारताने जगाला योगाचं, व्यायामाचं महत्व दाखवून दिलं आणि सुदृढ शरीर हाच खरा दागिना हेही जगाला पटलं. भारतात व्यायाम काय लेव्हलचा चालतो यात काय बोलायलाच नको. खेडोपाड्यात असणाऱ्या लाल मातीच्या तालमी आणि रंगणारे कुस्तीचे डाव, जोर ,बैठका, सपाट्या आणि खुराक यातच आपलं वैभव दिसून येतं. पण भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली ती म्हणजे एका मराठी माणसाने. अनेक लोकांना प्रश्न पडतो की कुस्ती अचानक इतक्या वर कस काय आली तर त्याचं श्रेय जातं एका मराठी माणसाला. जाणून घेऊया या कुस्तीच्या भीष्माचार्य बद्दल.

माणिक राव यांना आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक व मल्ल. पूर्ण नाव गजानन यशवंत माणिक (ताम्हणे). 31 डिसेंबर 1878 रोजी त्यांचा जन्म बडोदे येथे झाला. उस्ताद जुम्मादादा यांनी त्यांना मल्लविद्येचे धडे दिले. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ३,००० दंड, ५,००० बैठका व सात तास कुस्तीची मेहनत ते करीत असत. अस्थिसंधान, शस्त्रास्त्रविद्या व युनानी वैद्यक यांतही त्यांनी प्रावीण्य संपादन केले. गुरू जुम्मादादा यांनी आपल्या झोपडीवजा आखाड्याचे उत्तरदायित्व माणिकराव यांच्यावर सोपविले व माणिकराव यांनी आपल्या कर्तबगारीच्या बळावर त्या आखाड्यांचे रुपांतर ‘श्री जुम्मादादा व्यायाम मंदिरा’च्या (१९०४) भव्य वास्तूत केले.

माणिकराव यांनी त्याला शिवाजी मंदिर, उमा सभागृह, अस्थिसंधानालय, सरस्वती व्यासपीठ आणि जलतरण तलाव यांची जोड दिली. त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, जोडी, लकडी, बनेटी इ. अनेक देशी खेळ व व्यायामप्रकार यांना विविध पवित्रे देऊन, त्यांचे शास्त्र निर्माण करून, त्यांना सांधिक व्यायामांचे स्वरुप प्राप्त करून दिले.

त्यांनी बडोदे येथे ‘कन्या आरोग्य मंदिरा’ ची स्थापना केली व मुलींना व्यायामशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सैनिकी संचलने व कवायती यांच्यासाठी इंग्रजी आज्ञांऐवजी त्यांनी आज्ञाशब्द तयार केले. बडोद्यातील १९१८ सालच्या फ्ल्यूच्या साथीत व १९२७ च्या महापुराच्या वेळी त्यांनी भरीव समाजकार्य केले. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी क्रांतिकारकांना व्यायाम मंदिरात गुप्त आश्रय दिला, त्यांना शस्त्रविद्येचे धडेही दिले. त्यांनी बडोद्यात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवाजयंती उत्सव सुरू केले. त्यांच्या समाजकार्याच्या गौरवार्थ बडोदे सरकारकडून त्यांना ‘राजरत्न’ व ‘राजप्रिय’ या पदव्या बहाल करण्यात आल्या.

माणिकराव हे आजन्म ब्रह्मचारी होते.

भारतीय व्यायामविद्येचे ‘भीष्माचार्य’ म्हणूनही त्यांना गौरवाने संबोधण्यात येते.

त्यांच्या शिष्यशाखेत ‘कैवल्यधाम’ चे संस्थापक स्वामी कुवलयानंद, नाशीकच्या ‘यशवंत व्यायामशाळेचे संस्थापक कृ. ब. महाबळ, दादरच्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिर’ चे संस्थापक प्र. ल. लाळे आदींच्या अंतर्भाव होतो. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजवाड्यात त्यांनी भव्य शस्त्रसंग्रह उभारला व त्याचा परिचय करून देणारा प्रताप शस्त्रागार हा ग्रंथही लिहिला. भारतीय व्यायाम (१९४१) हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

25 मे 1954 रोजी बडोदे येथे त्यांचे निधन झाले. पण भारताला त्यांनी व्यायामाच्या सवयीची जी शिदोरी पुरवली ती अजूनही गावखेड्यात टिकून आहे आणि जोमाने जोपासली जात आहे. कुस्तीचे भीष्माचार्य म्हणून त्यांचं नाव अजूनही इतिहासात अजरामर आहे.

हे ही वाच भिडू :

The post आधुनिक भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात क्रांती करण्याचं श्रेय एका मराठी माणसाला जातं appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: