ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन?; केंद्र सरकारने केली भूमिका स्पष्ठ

December 03, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. हे संकट काहीसे कमी होत असताना मात्र आता ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. देशाचे याचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन पडणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. यावेळी ओमिक्रॉनचा धोका पाहता पुन्हा लॉकडाऊन लावावा लागणार का, असे विचारले असता त्यावर केंद्राकडून ‘वेट अँड वॉच’ पवित्रा घेण्यात आला आहे.

यामुळे सध्या तरी लॉकडाऊन लागणार नाही. मात्र येणाऱ्या काळात याबाबत निर्णय होऊ शकतो. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता अधिक सतर्क होण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. ओमिक्रॉनचा प्रसार देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही एक चिंताजनक गोष्ट आहे.

कोरोनामुळे अधिक देशाची आर्थिक घडी मंदावली आहे. यामुळे आता या नवीन संकटाशी दोन हात करताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या देशाला आणि कोणत्या राज्याला संपूर्ण लॉकडाऊन करणे परवडणार नाही. जगभरातील एकूण 25 देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आल्याचे सांगितले जात आहे.

यावर जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी स्पष्ठ माहिती नाही. असेही सांगितले जात आहे की ओमिक्रॉनमुळे सौम्य आजार होईल की नाही हेसांगणे खूप घाईचे ठरेल. याबाबत अधिक माहिती गोळा करत असून दोन ते तीन आठवड्यांनंतरच याबद्दल अधिक माहिती मिळेल. ओमिक्रॉनचे बहुतेक रुग्ण तरुण लोक आहेत. 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना याचा धोका आहे.

दक्षिण आफ्रिकेचे सरकार आणि शास्त्रज्ञांनी 25 नोव्हेंबर रोजी करोनाचे नवीन प्रकार जाहीर केले. यानंतर WHO ने त्याचे नाव ओमिक्रॉन ठेवले. आता जगभरात त्यांचा विस्तार होत आहे. आता नवीन व्हेरिएंटमुळे आपल्या जीवासाठी अधिक धोकादायक आणि प्राणघातक बनला आहे. यावर कोरोनाचे जे नियम आहेत, त्यांचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: