वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी गजाआड ! पोलीस आणि न्यायालयाची भीती दाखवून उकळायचे पैसे

December 03, 2021 , 0 Comments

देशभरातील हजारो बेरोजगार तरुणांना घरपोच नोकरी देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी एका मुलीसह चार आरोपींना अटक केली आहे. रोहित कुमार (२३), मोहित सिंग (२५), तरुण कुमार (२५) आणि वंदना (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या लोकांनी प्रथम बनावट वेबसाइट तयार करून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले.

नोकरी देण्यापूर्वी आरोपींनी या तरुणांसोबत गपचूपने काही करार करून घेतले. पुढे नोकरीच्या नावाखाली तरुणांना कामासाठी असे टार्गेट दिले गेले जे कधीच पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यानंतर अग्रीमेंट दाखवून तरुणांकडून मोठी रक्कम उकळण्यात आली. न्यायालयाचा धाक दाखवून पैसे न भरणाऱ्यांकडून वसुली करण्यात आली. आतापर्यंत पाचशेहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या लोकांनी हजारो लोकांची फसवणूक केल्याची भीती व्यक्त होत आहे.

सायबर सेलचे पोलीस उपायुक्त केपीएस गिल यांनी सांगितले की, नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) नंबरवर फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. घरातून कामाच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केल्याचे पोलिसांना समजले. या वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या काम करून मोठी कमाई करू शकता, असा दावा वेबसाइटवर करण्यात आला होता. तरुण त्यांच्या जाळ्यात येताच आरोपी अग्रीमेंटद्वारे त्यांना धमकावून पैसे उकळायचे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी इन्स्पेक्टर सज्जन सिंग, एसआय धर्मेंद्र कुमार आणि इतरांची टीम तयार करण्यात आली.

चार आरोपींना दिल्लीतील मोहन गार्डन आणि मायापुरी भागातून अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात या लोकांनी देशभरातील ५०० हून अधिक तरुणांना करोडोंची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या लोकांनी देशभरातील हजारो तरुणांची फसवणूक केल्याचे मानले जात आहे. पोलीस त्यांच्या बँक खात्यांचा शोध घेत आहेत.

तपासादरम्यान रोहित कुमार हा टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बनावट वेबसाइट तयार करून त्याने फसवणूक सुरू केली. त्यांनी बँक खात्यांची व्यवस्था केली. याशिवाय तो स्वत: टीम लीडर म्हणून बनावट कॉल सेंटर चालवत होता. अटक करण्यात आलेले उर्वरित तीन आरोपी हे टेलिकॉलर आहेत. या प्रकरणात आणखी काही लोक सामील असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

जर कोणी आरोपींना दंड भरण्यास नकार दिला, तर आरोपी त्यांना बनावट वकील म्हणून फोन करायचे. त्यांना न्यायालयाच्या नोटिसांचा धाक दाखवण्यात आला. याशिवाय आरोपी पोलिस असल्याची बतावणी करून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धमकावायचे. अशा परिस्थितीत बहुतांश तरुण घाबरून आरोपींच्या खात्यात पैसे टाकायचे. अटक आरोपींची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताज्या बातम्या
 गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी त्याने कपिल शर्माच्या साथीने लूटमार केली, पोलीस आले आणि राडा झाला
वोडाफोन आयडियाची मोठी खेळी, संतापलेल्या अंबानींनी केली ट्रायकडे तक्रार
अभिनेत्रीला बलात्काराची व जीवे मारण्याची धमकी देत होता चाहता; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अभिषेकने सांगितले ऐश्वर्यासोबतच्या लग्नाचे खरे कारण; म्हणाला, मी तिच्या सौंदर्यामुळे नाही, तर….


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: