ममतादिदींचा राष्ट्रवादीलाच दे धक्का! अख्ख राज्य सांभाळणारा बडा नेता फोडला

December 14, 2021 , 0 Comments

पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जींच्या गोव्यात दाखल झाल्या आहेत. ममता दीदींनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार फोडत शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने ममता दीदी सध्या इतर राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करत आहेत. नुकतीच ममतांनी महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांनी घेतलेली भेट मोठा चर्चेचा विषय ठरली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील एकमेव आमदार चर्चिल अलेमाव हे आता तृनमोल काँग्रेसच्या गटात सामील होणार आहेत. अलेमाव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करावे, असे पत्र दिले. अलेमाव हे बेनोलिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

अलेमाव ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश होणार आहे. अलेमाव हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या तृणमूल प्रवेशाने गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. ते गोवा काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जात होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र त्यांनी अचानक केलेल्या तृणमूल प्रवेशामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापाश्वर्भूमीवर तृणमूल काँग्रेसकडून गोव्यातील निवडणूक लढवली जाणार आहे. फलेरो यांच्यासारखा बडा नेता पक्षाच्या गळाला लागला आहे. तसेच यामुळे ममता दीदींचे अस्तित्व मोदी सरकार विरोधात देखील पणाला लागणार आहे.
ताज्या बातम्या
…साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी मोदींची तुलना नको! भाजपचा शरद पवारांना टोला
‘नववधू प्रिया मी बावरते’! कतरिना कैफच्या ब्राइडल लूकची चर्चा; पहा सुंदर फोटो
माधुरीमुळेच हिट झाल्यात ऐश्वर्या, काजोल, शिल्पा; वाचा पडद्यामागची कहाणी..
आता एसटीला राज ठाकरेच फायद्यात आणणार, उद्धव ठाकरेंना सांगितला ‘हा’ उपाय…  


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: