लहान भावाने भांडणात मध्यस्थी केली आणि मोठ्या भावाच्या जीवावर बेतली....

December 14, 2021 0 Comments

कल्याण: लहान भावाने भांडणात मध्यस्थी केली याचा राग मनात ठेवून काही तरुणांनी केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. जखमी तरुणावर एका रुग्णलयात उपचार सुरु आहेत.कल्याण पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. (the younger brother mediated the dispute for the reason some young people attacked elder brother) कल्याणच्या आधारवाडी परिसरात राहणारे काही तरुण एका ढाब्यावर बसले होते. या दरम्यान विजय शिंदे आणि त्याचा मित्राचा बंटी नावाच्या एका तरुणासोबत काही कारणावरुन वाद झाला. वाद सुरु असताना या ठिकाणी असलेल्या अक्षय भालेराव या तरुणाने मध्यस्थी करीत भांडण सोडविले. दोन्ही गटांना घरी जाण्यास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन विजय शिंदे, विकास शिंदे, हर्षद पाटील, प्रतिक ठाकरे हे तरुण पुन्हा अक्षयच्या शोधात आले. क्लिक करा आणि वाचा- दुसऱ्या दिवशी अक्षयला एका ठिकाणी भेटले. विजय शिंदे यांने अक्षयला भांडणात मध्यस्थी केल्याबद्दलचा जाब विचारला आणि तेव्हा जास्त शहाणपणा करीत होता,आता कोणाला बोलवायचे ते बोलव. आम्ही तुला सोडणार नाही, असे बोलत सर्वांनी अक्षयला घेरले. अक्षयने लगेच त्याचा मोठा भाऊ विशाल याला फोन केला. विशाल त्याठिकाणी आला. विशालने सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेला विजय शिंदे आणि त्याच्या मित्रंनी विशालवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. क्लिक करा आणि वाचा- यात विशाल गंभीररित्या जखमी झाला आहे आणि त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे. आता याप्रकरणी हल्ला करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.तर बाकीच्या आरोपीचा शोध सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: