एकदम जोशात नवरदेव पोहचला लग्नात, पण मुलीकडच्याच लोकांनी नवरदेवाला धुतले; वाचा नक्की काय घडलं?
सध्या सगळीकडेच लग्नाचा सिजन आहे. त्यामुळे लग्नामध्ये भांडण झाल्याच्या अनेक घटना घडत आहे. अशात गोरखपूरमधून एक विचित्रच घटना समोर आली आहे. इथे लग्नसाठी आलेल्या नवरदेवलाच लोकांनी चोप चोप चोपले आहे.
तसेच नवरदेवाला पोलिसांनी उचलून नेले आहे. त्याला यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, कारण त्याची पहिली पत्नी असतानाही तो दुसऱ्या लग्नाचा विचार करत होता. लग्नाच्या दिवशी वरात पोहोचण्यापूर्वीच वराची पहिली पत्नी तिच्या चार वर्षाच्या मुलासह तिथे आली होती होती.
वरातीसह आलेल्या वराला आपल्या पहिल्या पत्नीची नजर लागली तेव्हा तो पोल खुलणार या भीतीने तो घटनास्थळावरून पळू लागला होता. मात्र वरातीचे स्वागत करण्यासाठी हातात फुले घेऊन उभ्या असलेल्या लोकांनी त्याला धाव घेत पकडले.
नवरदेवाचे हे दुसरे लग्न असल्याचे कळताच गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर पोलिसांना बोलावून त्याला पोलीस ठाण्यात पाठवले. पोलिसांसमोर येताच नवरदेवाने माफी मागायला सुरुवात केली. मात्र अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर नवरदेवावर एफआयआर दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
घटनास्थळी पोहोचलेल्या गुलरीहा पोलिसांनी आरोपी वराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, त्यानंतर मुलासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, त्यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
त्यांना चार वर्षांचा मुलगाही आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिला समजले की तिचा नवरा पुन्हा लग्न करणार आहे, तेव्हा तिचा नवरा पुन्हा लग्न करू नये म्हणून ती येथे पोहोचली. आरोपी वराने पोलिसांसमोर माफी मागायला सुरुवात केली.
तर दुसरीकडे वधू म्हणून बसलेल्या पीडित मुलीच्या आईने आरोप केला आहे की, वर्षभरापूर्वी आरोपी तरुणाने खोटे बोलून लग्न ठरवले होते. लग्नाच्या तयारीवर आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक रुपये त्यांच्या कुटुंबीयांनी खर्च केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या लेकीसह गाठले राज ठाकरे यांचे निवास्थान, काय आहे नेमके प्रकरण…
काय सांगता! दहाव्या वर्षीच करोडोंची मालकीन; जाणून घ्या, या चिमुकलीच्या व्यवसायाबद्दल..
फ्लिपकार्टच्या ऑफरने घातला धुमाकूळ! कॅमेरा आणि 4G स्मार्टवॉच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: