कालसर्प पूजेवरून दोन पुजाऱ्यांमध्ये हाणामारी, चाकू, कोयत्यांनी केले एकमेकांवर वार; परिसरात खळबळ
कार्यक्रम कोणातही असो त्यामध्ये पुजाऱ्यांना देवाची पूजा करण्यासाठी किंवा विधी पूर्ण करण्यासाठी बोलवावे लागते. अनेकदा तर पूजेसाठी पुजारीच लवकर भेटत नाही. असे असताना नाशिकमध्ये एक विचित्रच घटना घडली आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प पूजा करण्यावरून चक्क दोन पुजारांमध्ये हाणामारी झाली आहे. यावेळी त्यांनी चक्क गावठी पिस्तुल, कोयते, चालू काढले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.
त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिलिंगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी हजारो वर्षांपासून पूजा पाठ सुरू आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कुटुंब मराठी आहे. पण काही महिन्यांपासून याठिकाणी पुजारी आणि परप्रांतीय तरुणांमुळे खूप गोंधळ उडत आहे. अनेकदा तर वाढी होतात.
या मंदिरात नागपूरचे एक भाविक आले होते. त्यांना कालसर्प पूजा करायची होती. त्यासाठी दोन पुजारांमध्ये भांडण सुरू झाली. एका पुजाऱ्याने या पूजेसाठी ११ हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले, त्यामुळे भाविक कुटुंबही हैराण झाले. तर दुसऱ्या पुजाऱ्याने ही पूजा कमी पैशांमध्ये केली. त्यामुळे दोघांमधल्या भांडणाला सुरुवात झाली.
दोघे पुजारी हे पंचवटीच्या हिरावडीत राहतात. दोघेही आपापल्या घरी आल्यांनातर दोघांमध्ये पून्हा एकदा वादाला सुरुवात झाली. इथेच त्यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. इथेच त्यांनी कोयता, पिस्तुल काढली होती. दोघे पण हॉकीस्टिक घेऊनही एकमेकांना मारत होते.
दरम्यान तिथल्या लोकांनी याबाबत पोलिसांना कळवले, त्यानंतर पोलीस तातडीने तिथे आले. पण तरीही दोघांमध्ये भांडण सुरू होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरी ते एकमेकांना मारत होते. त्यामुळे या प्रकरणी कुटुंबातील सदस्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोन्ही कुटुंबातील वीरेंद्र हरिप्रसाद त्रिवेदी, आशिष वीरेंद्र त्रिवेदी, मनीष वीरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्यप्रसाद तिवारी, आकाश नारायण त्रिपाठी, अनिकेत उमेर तिवारी, सचिन नागेंद्र पांडे यांची नावे आहे. या सर्वांवरती गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या लेकीसह गाठले राज ठाकरे यांचे निवास्थान, काय आहे नेमके प्रकरण…
काय सांगता! दहाव्या वर्षीच करोडोंची मालकीन; जाणून घ्या, या चिमुकलीच्या व्यवसायाबद्दल..
फ्लिपकार्टच्या ऑफरने घातला धुमाकूळ! कॅमेरा आणि 4G स्मार्टवॉच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: