बायको दिवसातून करायची ६ वेळा अंघोळ; सत्य समोर आल्यानंतर हादरला पती, घटस्फोटाची केली मागणी
बऱ्याचदा काही लोकांना असे आजार होतात जे ऐकायला खुप सामान्य असले तरी त्याचा मानसिक स्वास्थ्यावर खुप वाईट परिणाम होतो. त्यातलाच एक आजार म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD), सोप्या भाषेत, मेंदूच्या आजाराचा एक प्रकार आहे.
या आजारामुळे भीतीने ग्रासलेली व्यक्ती एखादे काम पुन्हा पुन्हा करते. बंगळुरूमधून समोर आलेले प्रकरण OCD शी संबंधित आहे, जिथे पत्नीच्या साफसफाईच्या सवयीमुळे संतापलेल्या पतीने घटस्फोट मागितला आहे. तर पत्नीने पतीच्या वर्तवणूकीला असामान्य म्हणत तक्रार दाखल केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, या दाम्पत्याचे २००९ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने दोघे इंग्लंडला गेले. इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण पुढे जाऊन परिस्थिती खुपच बदलत चालली होती.
या जोडप्याचे प्रकरण हाताळणारे बंगळुरू शहर पोलिसांचे वरिष्ठ वकील बीएस सरस्वती म्हणतात, दोन वर्षांनी, पहिल्या मुलाच्या जन्मानंतर परिस्थिती बिघडू लागली. प्रत्येक वेळी पत्नी कामावरून परतल्यावर पतीने चपला, कपडे, सेलफोन साफ करण्यास भाग पाडल्याने पती नाराज झाला.ब्रिटनमधून परतल्यानंतर या जोडप्याने फॅमिली काऊन्सिलिंगचा अवलंब केला आणि परिस्थिती सुधारू लागली. यानंतर या जोडप्याने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
रिपोर्टनुसार, कोविड आल्यानंतर पत्नीची ओसीडी बिघडली आणि तिने घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. सरस्वती म्हणाल्या, ‘लॉकडाऊनच्या काळात नवरा घरातून काम करत होता. त्यामुळे पत्नीने चक्क लॅपटॉप आणि सेलफोनही धुतला होता. तिच्या तक्रारीत पतीने सांगितले आहे की ती दिवसातून ६ पेक्षा जास्त वेळा अंघोळ करते आणि आंघोळीचा साबण स्वच्छ करण्यासाठी वेगळा साबण वापरते.
महिलेच्या आईचे गेल्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर तिने पती आणि मुलांना जबरदस्तीने घराबाहेर ठेवले आणि तीस दिवस साफसफाई केली. सरस्वती म्हणाल्या, पतीसोबत हैराण करणारी गोष्ट तर तेव्हा घडली जेव्हा जेव्हा पत्नी घरी परतल्यानंतर मुलांना दररोज शाळेचा गणवेश आणि शूज धुण्यास भाग पाडायची. यानंतर तो मुलांना घेऊन त्याच्या आईवडिलांच्या घरी आला. तर पत्नी पोलिसात पोहोचली. या जोडप्याला ११ आणि ९ वर्षांची दोन मुले आहेत.
पोलिसांनी हे प्रकरण फॅमिली काऊन्सिलकडे नेले, जेथे काऊन्सलरला महिलेचा गंभीर OCD संशयास्पद वाटला आणि महिलेला मदतीची गरज असल्याचे सुचवले. तर महिलेने आपण ठीक असल्याचे सांगितले आणि साफसफाईच्या सवयी ‘सामान्य’ असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मॉलमध्ये नग्न अवस्थेतच गेली अडल्ट मॉडेल, गार्डने धक्का देऊन काढले बाहेर; पहा व्हिडिओ
स्मिता गोंदकरच्या बिकीनी फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड
कामावर न येणाऱ्या एसटी संपकऱ्यांना सरकार देणार जबर धक्का, घेणार ‘हा’ कठोर निर्णय
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: