मित्रानेच केला मित्राचा घात, चोरी नंतरच्या वादातून झालेला बेबनाव जीवावर बेतला

December 21, 2021 0 Comments

जालना : २५ वर्षीय तौफिक खान खूनप्रकरणातील आरोपी सागर डुकरे याला चंदनझिरा पोलिसांनी सिंदखेड राजा येथून जेरबंद केले. परवा रात्री मयत तौफिक खान आणि आरोपी सागर डुकरे या दोघांनी नशेच्या गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर त्यांनी रात्री जुना जालना परिसरातील शनी मंदिर परिसरात आणि उड्डाणपुलावर लुटमारीच्या दोन घटना केल्या. एका घटनेत एका व्यक्तीस मारहाण करून त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटली तर दुसऱ्या घटनेत अजून एकाचा मोबाईल हिसकावून पाळून गेल्याचे समजते आहे. नशेच्या धुंदीतच सागर डुकरे आणि तौफिक हे दोघे सागरच्या मोटरसायकलवरून औरंगाबाद रोडवरील बारवाले कॉलेजच्या मागील पडीत जागेत गेले. तिथेच त्यांच्यात वादावादी झाल्याने सागर डुकरे याने त्याच्या सोबत असलेल्या लोखंडी पाइपने तौफिक याच्या डोक्यावर वार केले. त्यात तो मरण पावल्यानंतर सागर डुकरे याने तेथून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणातील मयत तौफीक आणि आरोपी सागर डुकरे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे कळते आहे. जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात येत नाही तोपर्यंत मयताला घेऊन जाणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मृत तरुणांच्या नातेवाईकांनी बराच वेळ पोलिसांशी हुज्जत घातल्याने DYSP निरज राजगुरू यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या नातेवाईकांना समजावून उत्तरीय तपासणीसाठी मृत तरुणाचे शव घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी देखील घटनास्थळी पोहचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: