परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? 'त्या' रिसॉर्ट चा बिनशेती परवाना रद्द;सोमय्यांची माहिती
रत्नागिरी: राज्यातीस महाविकास आघाडी सरकारचे एक मंत्री (Anil Parab) यांनी विक्री केलेल्या जागेवरील दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्ट बेकायदेशीर आहे व त्याचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपा नेते आणि माजी खासदार (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री परब यांच्यावर आरोपही केले. हा परवाना फसवणुकीने, फॉर्जरी करून घेण्यात आला होता. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तो बिनशेती परवाना आत्ता रद्द करण्यात आला आहे आहे असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र शासनाने लोकायुक्त यांच्याकडील सुनावणीदरम्यान दाखल केले आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली. यामुळे आता परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे रिसॉर्ट तत्काळ पाडण्यात यावे अशी मागणी ठाकरे सरकारकडे सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे. ( has informed that the non agricultural license of the land sold by minister has been canceled) क्लिक करा आणि वाचा- सोमय्या यांनी एका ट्विटद्वारे हे आरोप केले आहेत. या संबंधीचे पत्र किरीट सोमय्या यांनी माध्यमांना उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार, प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरूड येथील गट नं. ४४६ पैकी क्षेत्र ४२००.३० चौ.मी., उपविभागीय अधिकारी दापोली यांजकडून निर्गमित करण्यात आलेल्या बिनशेती आदेशाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५७ अन्वये पुनरिक्षणाबाबतची सुनावणी होऊन या प्रकरणी या कार्यालयाकडील आदेश के महाकार्या/एल-अकलम २५७/अर्ज क. ३७/२०२१ दिनांक ०३/१२/२०२१ अन्वये निर्णय झालेला आहे. या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी दापोली आदेश एलएनएएसआर १२२/२०१७ दिनांक १२/०९/२०१७ रोजी बिनशेती आदेश रद्द करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- या रिसॉर्टबद्दलची पुढची सुनावणी दिवाणी न्यायालयात १३ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: