हिरोसारखा आला प्रियकर, लग्न सुरू असतानाच स्टेजवर चढून भरले नवरीच्या भांगेत कुंकू; विचित्र व्हिडीओ व्हायरल

December 08, 2021 , 0 Comments

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गोरखपूर येथील हरपूर बुधात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बुधवारी रात्री लग्न सुरू असताना वधूच्या भांगेत प्रियकराने कुंकू भरले आहे. त्यांनतर

त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून वधूच्या नातेवाईकांनी पोलिसांना फोन केला. रात्री उशिरापर्यंत चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी पंचांच्या व दोन्ही बाजूच्या लोकांच्या मदतीने प्रकरण मिटवले. गुरुवारी सकाळी वधूला वरासह निरोप देण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. काही महिन्यांपूर्वी हा तरुण कमाईसाठी बाहेर गेला होता. दरम्यान, कुटुंबीयांनी मुलीचे लग्न ठरवून टाकले. तरुणाला त्याच्या प्रेयसीचे लग्न ठरल्याचे समजताच तो दोन दिवसांपूर्वी गावी परतला. १ डिसेंबर रोजी मुलीच्या लग्नात पुष्पहार घालत असताना प्रियकराने हे अनपेक्षित पाऊल उचलले.

तो लग्नाच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा विधी झालेले होते. जेव्हा तो स्टेजवर पोहोचला तेव्हा फोटो सेशन चालू होते. हे पाहून त्याने थेट नवरीच्या भांगेत कुंकू भरले. वधूनेही त्याला साथ दिली, मात्र मुलीच्या घरच्यांनी त्याला साथ दिली नाही.

मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावले. वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये वाद वाढू लागला. त्याचवेळी प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना सोडण्यास तयार होत नव्हते. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पाहताच प्रेयसीचे प्रेम संपुष्टात आले. पोलिसांना बघून त्याने माघार घेतली आणि तो घरी गेला.

दरम्यान, मुलगी व वराच्या बाजूच्या लोकांनी हे प्रकरण मिटवले आणि लग्न पार पडले. सकाळी वधूला निरोप देऊन वर वधू आपल्या घरी गेले. सध्या या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा सूरी असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

महत्त्वाच्या बातम्या-
हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या लेकीसह गाठले राज ठाकरे यांचे निवास्थान, काय आहे नेमके प्रकरण…
काय सांगता! दहाव्या वर्षीच करोडोंची मालकीन; जाणून घ्या, या चिमुकलीच्या व्यवसायाबद्दल..
फ्लिपकार्टच्या ऑफरने घातला धुमाकूळ! कॅमेरा आणि 4G स्मार्टवॉच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: