Sunil Patil: 'सुनील पाटील गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय?'; शेलार CBI चौकशीसाठी आग्रही

November 07, 2021 0 Comments

मुंबई: धुळ्यातील (Sunil Patil) याचा राष्ट्रवादीशी (NCP) संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून 'गेम' वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करुन या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे (CBI) द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत हे स्पष्ट होईल. अशी आग्रही मागणी करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या सुरु असलेल्या पत्रकार परिषदा म्हणजे, ड्रग्ज आणि पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी सुरु असलेला एकपात्री प्रयोग असल्याची टीकाही आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. (bjp mla has demanded an inquiry into the case through cbi) आज जे नाव समोर आले तो सुनील पाटील कोण आहे?, सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही?. त्याचा राष्ट्रवादीशी संबंध काय?, असे सवाल यांनी उपस्थित केले आहेत. अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना संधी देत आहोत. खरे सांगा, नाही तर आता आमच्या हाताला बरेच काही लागले आहे. जर सत्य समोर आले तर तुम्हाला बाथरूमच्या आतमध्ये शौचालयात सुध्दा तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशाराही आमदार आशीष शेलार यांनी दिला. क्लिक करा आणि वाचा- हा सुनील पाटील माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची बदनामी करतो आणि राष्ट्रवादीला त्यांचे काही वाटत नाही, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तळपायाची आग मस्तकाला का जात नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच धक्कादायक म्हणजे हा सुनील पाटील आपल्या संभाषणात आत्ताचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची बदनामी करतोय. ज्या गृहमंत्री वळसे-पाटील यांचा महाराष्ट्र आदर करतो त्यांच्या विषयी हा सुनील पाटील बोलतो? मद्यपींच्या बैठका? काय चाललय हे? कसल्या बैठका? कोण हा माणूस? या सुनील पाटलांचा धंदा काय? असे सवाल आमदार शेलार यांनी उपस्थित केले आहेत. क्लिक करा आणि वाचा- या सुनील पाटीलचा धंदा हा मंत्रालयातील बदल्यांच्या दलालीचा आहे. त्यामुळे हा सुनील पाटील गायब आहे, परागंदा आहे की राष्ट्रवादीने त्याला लपवले आहे. आमचा राष्ट्रवादीवर आरोप आहे की, पोलीस बदलत्यांमधील मुख्य दलाल हा गायब, परागंदा नसून त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे का? संरक्षण दिले आहे का? इंडियन पोलीस सेवेचा खाक्या मोडकळीस आणण्याचा हा सुनील पाटील प्रयत्न करीत असल्याने त्यावर गुन्हा दाख करुन तपास सीबीआयकडे तपास द्यावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: