धक्कादायक! पालकांनो काळजी घ्या, ३ वर्षांच्या मुलाने Pop-Up फटाका गिळला आणि गमावला जीव

November 05, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । सध्या दिवाळीचा सण सुरू असून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवत आहेत. असे असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे या कुटूंबावर ऐन दिवाळीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

सुरतच्या डिंडोलीमध्ये तीन वर्षांच्या मुलाने पॉप-अप फटाके खाल्ल्याची घटना घडली. अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊन मुलाची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे एकच खळबळ उडाली.

वडिलांनी आपल्या 3 वर्षाच्या मुलासाठी फटाके आणले होते. मूल लहान असल्याने हे फटाके फोडून झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यानंतर मुलाने फटाखा गिळला आणि तो आजारी पडला पण त्यानंतर बरा झाला नाही. त्याची तब्येत बिघडत गेली.

अतिसार आणि उलट्यात पॉप-अप फटाके फुटल्याने त्याला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. यामुळे हे फटाके किती महागात पडले याचा अंदाज आपल्याला येईल. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

मुलाने फटाके खाल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच सर्व पालकांनी दिवाळीच्या फटाक्यांपासून आपल्या मुलांना सांभाळून आणि सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. फटाके फोडल्याने अनेक वेगवेगळ्या घटना देखील घडत असतात.

त्यांनी पहिल्यांदाच मुलांसाठी फटाके आणले होते. मात्र मुलाने फटाका केव्हा खाल्ला हे समजले नाही. मात्र ही घटना घडल्यानंतर याचे कारण समोर आल्यानंतर एकच धक्का बसला. यामुळे आता इतर पालकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: