युपीत ३० टक्के लोकांना भाकर मिळेना आणि लावले १२ लाख दिवे, लागले ३६ हजार लीटर तेल

November 05, 2021 , 0 Comments

लखनऊ । सध्या दिवाळीचा सण संपूर्ण देशात आनंदात साजरा केला जात आहे. असे असताना उत्तर प्रदेशात दिवाळीत भगवान रामची अयोध्यानगरी दिव्यांनी उजळून निघाली. या निमित्त १२ लाख दिवे लावण्यात आले. यात ३६ हजार लीटर मोहरीचे तेल वापरले गेले. यावर लाखोंचा खर्च करण्यात आला आहे.

यामुळे सरकारवर टीका केली जात आहे. माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. ते ट्विट करत म्हणाले की, की १२ लाख दिवे, ३६ हजार लीटर तेल, गरीब प्रदेशात ३० टक्के लोकांना भाकर मिळत नाही. आज श्रीरामाचे अयोध्यात आगमन अवश्य झाले असेल.

त्यांच्या ट्विटवर इतरांनीही समर्थनार्थ ट्विट केले आहे, जेव्हा राज्य आणि देशात प्रचंड गरिबी आहे. लाखो लोकांना भाकर मिळत नसताना हजारो दिवे लावणे कितपत योग्य आहे. आनंद साजरा करताना अगोदर दुसऱ्या लोकांनाही आनंदी ठेवा, असे म्हटले आहे.

बीजेपीच्या या पाखंड्यांना केवळ दिखावा करता येतो. राम नामावर आज कित्येक गरिबांच्या घरी भाजपच्या महागाईमुळे दिवाळी साजरी होणार नाही. ५० टक्के मुलांना दूध व ३० टक्के लोकांना दोन वेळेची भाकर मिळत नाही, असेही अनेकांनी म्हटले आहे.

अयोध्यात ९ लाख आणि इतरत्र ३ लाख दिवे लावण्यात आले. रामजन्मभूमी परिसरात ५१ हजार दिवे जाळण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डच्या टीमने दिव्यांची संख्या मोजली. १२ लाख दिवे लावण्यासाठी ३२ टीमने काम केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिरवणूक काढण्यात आली. उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा अयोध्यात उपस्थित होते. यामुळे आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: