संपूर्ण जोशी कुटुंबाने विष घेऊन केली आत्महत्या ! परिसरात एकच खळबळ

November 27, 2021 , 0 Comments

एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमधील जोशी कुटूंबाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आनंदनगरमधील अशोक विहारमधील संजीव जोशीच्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. कौटुंबिक कलहातून झालेल्या वादामुळे जोशी कुटूंबाने हे धाडस केल्याचे स्पष्ट झाले आहे. संजीव जोशी, त्याची पत्नी अर्चना, आई नंदनी, दोन मुली पूर्वी आणि गिरिश्मा यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आतापर्यंत पूर्वी आणि नंदनी यांचा मृत्यू झाला आहे.

जोशी कुटुंबाने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची नावं लिहिली आहेत. या सर्वांना त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे.

काय म्हटलंय नेमकं सुसाईड नोटमध्ये
अर्चनाने बबलीने केलेल्या अत्याचाराबद्दल सविस्तर माहिती सुसाइड नोटमध्ये दिली आहे.
बबलीने आपला खूप छळ केल्याचं तिने म्हटले आहे.
बुधवारी बँकेततुन घरी आल्यानंतर बबलीने घराजवळ गोंधळ घातला. यावेळी उर्मिलाही सोबत होती.
व्यवहाराची रक्कम भरण्यासाठी ते त्यांचे घरही विकत होते पण बबलीचा यावर विश्वास बसत नव्हता.
बुधवारी त्यांनी पैसे परत न केल्याचा आरोप कुटुंबीयांवर केला होता.
मुलगी उर्मिलाने आईला शिवीगाळ सुरू केली.
यानंतर त्यांनी फोनवर पूर्वी आणि गिरिश्मा यांना उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली होती.
या त्रासामुळे कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली आहे.

जोशी कुुटुंबाने सुसाइड नोटमध्ये दिल्यानुसार, ते मुलांच्या शाळेची फीदेखील देऊ शकले नाही. जोशी कुटुंबाने मृत्यूनंतर कोणत्याही नातेवाईकांनी न येण्याचं सांगितलं आहे. वेळेवर आला असता तर कुटुंब वाचू शकलं असतं असंही यात लिहिलं आहे.

बबली ही अशोका गार्डन येथे राहणारी आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी संजीव जोशीची पत्नी अर्चनाने या सर्वांचे नावं आणि मोबाइल नंबर सुसाइड नोटमध्ये लिहिले आहेत. सुसाइड करणाऱ्या कुटुंबाने राजू राय आणि लक्ष्मी राय यांचं नाव लिहिलं आहे. ज्यात 30 हजार रुपयांच्या उधारावर व्याज दोन लाख वसुल करण्याचं लिहिलं आहे. कुटुंबाने दावा केला आहे की, त्यांनी 23 नोव्हेंबर पर्यंत व्याज दिलं आहे. एका दिवसासाठी त्यांच्याकडून 5 रुपये व्याज घेण्यात आलं.
ताज्या बातम्या
 ठाकरे सरकारचा चांगला निर्णय! कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत; ‘असा’ मिळवा लाभ
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; म्हणाली, आता जास्त काळ थांबू नाही शकत
आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी उडवणार भाजपचा धुव्वा; पहा कोणाला किती जागा मिळणार..
एकेकाळी डिप्रेशनची शिकार झालेला श्रेयस अय्यर कसा बनला शतकवीर? जाणून घ्या खडतर प्रवास..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: