ठाकरे सरकारचा चांगला निर्णय! कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत; ‘असा’ मिळवा लाभ

November 27, 2021 , 0 Comments

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविड १९ या आजारामुळे निधन पावली आहे, तसेच जर त्या व्यक्तीने कोविड १९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांस ५० हजार रुपये सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हा लाभ मिळवण्यासाठी लवकरच एका वेब पोर्टलची सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा ते गाव पातळीवर याबाबतची सर्व माहिती पोहचवण्यात येणार आहे. यासाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक २०२१११२६१६१२२१०५१९ दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.

अशी असेल प्रोसेस
पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत.
ही मदत मिळण्यासाठी कोविड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; म्हणाली, आता जास्त काळ थांबू नाही शकत
वहिणी मोबाईलवर बोलत असल्यामुळे संतापला दिर, वहिणीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य
एकेकाळी डिप्रेशनची शिकार झालेला श्रेयस अय्यर कसा बनला शतकवीर? जाणून घ्या खडतर प्रवास..
मुकेश अंबानी व्यवसायाची जबाबदारी पुढच्या पिढीला सोपवण्याच्या तयारीत; जाणून घ्या मास्टर प्लॅन

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: