“फडणवीस साहेब माफी न मागण्याच्या मतावर ठाम राहा, उद्या मुलीची नोटीस येईलच”

November 10, 2021 , 0 Comments

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधीत आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

आता नवाब मलिक आक्रमक झाले असून त्यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, फडणवीसांचे फटाके फुसके निघाले. मी उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचे सांगितले आहे.

त्यांनी आज जमीनीचे कागद समोर ठेवले. जमीन कवडी मोल दराने माफीयांकडून खरेदी केली, असा आरोप फडणवीसांनी केला. फडणवीसजी तुम्हाला ज्यांनी माहिती दिली ते कच्चे खिलाडी आहेत. तुम्ही सांगितले असते तर मीच कागद दिले असते, असेही ते म्हणाले.

फडणवीस साहेब, माफी न मागण्याच्या मतावर ठाम राहा, उद्या मुलीची नोटीस येईलच, असेही ते म्हणाले. शहरामध्ये देवेंद्र फडणवीसांचे जवळचे लोक प्लॉट हडपण्याचे धंदे कुठल्या अधिकाऱ्याच्या मार्फत करत होते, याचा तपास तुम्ही करावा. कुठल्या आंतरराष्ट्रीय डॉन, जो विदेशातून भारतात आला होता तो कुणासाठी काम करत होता, याची माहिती उद्या १० वाजता देणार, असेही ते म्हणाले.

तसेच फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावे, चौकशीस तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. यामुळे आता मलिक उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक रोज अनेक धक्कादायक खुलासे करत आहेत. यामुळे चर्चा सुरू आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: