स्वराज्यावर चालून आलेल्या खानानं सर्वात आधी आपल्या ६४ बायकांना डुबवुन मारलं.
शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला हरवून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली.
बादशाहने शहाजी राजेंना पत्र लिहून शिवाजीला थांबवा असा सांगावा धाडला. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता.
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अली आदिलशहा दुसरा आणि त्याची आई बडी बेगम उलिया जनावा ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं. आणि आपल्या सर्व सरदारांस आव्हान केले कि,
कोण रोखेल त्या शिवाजीला
कोणीच तयार होत न्हवत. तेव्हढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला,
मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा !
आदिलशहाचा मातब्बर सरदार अफजल खान याने हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासानं ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. अफजल खान म्हणजे स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठे संकट होतं. कारण ज्या अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजीराजांना कपटाने मारलं त्याच खुनशी राजकारणाचा भाग म्हणून शहाजीराजे यांना अटक झाली.
तो अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता. एका मोठ्या फौजेचा तो अधिकारी होता. यात त्याची ताकद किती आहे हे दिसून येतं. राजकीय बुद्धिमत्तेचा वापर करून त्याने शहाजीराजांना अटक घडवली आणि शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली यात तो किती क्रूर होता हे दिसून येतं. शाही फर्माने आणि मोठी फौज घेऊन अफजलखान विजापुरहून निघाला.
मोहिमेवर निघण्याची तयारी सुरू असताना खान त्याच्या गुरूकडे कौल मागण्यासाठी गेला. गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे यश येणार नाही तुझा जीविताला धोका पोहोचेल असं भाकित वर्तवलं. पण खानाला आपल्या कर्तबगारीवर जास्तच विश्वास होता म्हणून खानन आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचं निश्चित केलं.
त्यात भरीस भर म्हणून विजापूरहून स्वराज्यात येताना त्याच्या सैन्यदलातील निशाणीचा हत्ती म्हणजे ढालगज फत्ते लष्कर हा अचानकपणे मरण पावला. केलेले भाकीत आणि प्रकरणामुळे खानाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागली.
जर गुरूच भाकित खरं ठरलं तर आपल्या माघारी आपल्या ६४ बायकांचा काय होईल हा प्रश्न उभा राहिला.
हा गुंता त्यानं क्रूर खुशी वृत्तीने संपून टाकला. विजापूर जवळ इज बावडी आहे.म्हणजेच एक विहीर होती. त्या वेळी त्यान त्याच्या बायकांना या बावडीत बुडवून मारलं आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन करून टाकलं. त्या बायकांच्या एकूण ६४ कबरी असल्यान विजापूर मधला हा भा आजही साठ कबरीया या नावाने ओळखला जातो.
अफजलखानाच्या बायकांची ही कबर आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. एका चौथऱ्यावर ६४ समाध्या पाहताना कोणाचीही भीतीने गाळण उडेल.
हे ही वाच भिडू
- अवघे १४ वर्षांचे शंभूराजे गुजरात मोहिमेवर गेले आणि मोहीम फत्ते केली…
- नेताजी पालकर ९ वर्षे अफगाणिस्तानच्या या किल्ल्याचे किल्लेदार होते.
- आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.
The post स्वराज्यावर चालून आलेल्या खानानं सर्वात आधी आपल्या ६४ बायकांना डुबवुन मारलं. appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: