‘मी माझा पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी त्यांचे घर चालवून दाखवावे’

November 19, 2021 , 0 Comments

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. हे कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याने एसटी संपाबाबत अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, राज्य सरकारने यावर एकत्रितपणे तोडगा काढण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे आतातरी एसटी संपावर नेमका काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई आझाद मैदानावर याबाबत आंदोलन सुरू आहे. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने गेल्या 8 पेक्षा अधिक दिवसांपासून एसटी ठप्प झाली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या, तरी विलीनीकरणाबाबत अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. कोर्टात देखील हे प्रकरण गेले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हजारो एसटी बस आगारातच उभ्या आहेत. याचा जबर फटका प्रवाशांनाही बसत आहे. यामुळे यावर कधी तोडगा निघणार असा प्रश्न विचारला जात आहे.

एसटी आंदोलनावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही लगावला होता. यामुळे कर्मचारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन कर्मचाऱ्याने त्यांना सुनावले आहे.

तुम्ही म्हणता हाय या पगारात करा, आम्ही तुम्हाला मागितलंच काय आहे. मी माझा 25 हजार रुपये पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी स्वत:चे घर चालवून दाखवा, असे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

तसेच संजय राऊत यांनी असली वक्तव्य करू नयेत, यामुळे अजून आत्महत्या वाढतील. असे या कर्मचाऱ्याने म्हटले आहे. राज्य सरकारकडून हा संप मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर विरोधक मात्र संपला पाठिंबा देऊन संपावर ठाम आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: