‘मी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय मला आता रडू येतंय, कंगनाचे समर्थन केल्यानंतर गोखलेंचे वक्तव्य
पुणे । जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले सध्या चर्चेत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणावत यांच्या वक्तव्याला समथने केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. कंगनाने 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळाले, असे वक्तव्य केले होते.
यामुळे कंगनावर देशभरातून संताप व्यक्त होत असताना विक्रम गोखले यांनी तिच्या वक्तव्याला समर्थन दिले होते. ते म्हणाले होते की, कंगना जे म्हणाली जे खरं आहे. मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही. ते भीकेनेचं मिळाले आहे, यामुळे ते सुद्धा वादात सापडले.
आता त्यांच्यावर टीका झाल्याने पुन्हा ते म्हणाले, माझं त्या दिवशीचे भाषण तुम्ही ऐकलयं का? मी कंगना राणावतला ओळखत देखील नाही. माझी तिची ओळख नाही आणि कधीच सोबत काम केलं नाही. मला आईबहिणीवरून शिव्या देण्यात आल्या.
मला चप्पल मारण्याची भाषा केली जातेय, हे सर्व चुकीचे मी सहन करतोय, मी याक्षणी खुप वेगवेगळ्या पातळ्यांवरून लढतो आहे, आता मला रडू येतंय, माझ्याविषयी जे काही लिहून आले त्याचे उत्तर मी 19 तारखेला देणार आहे. त्या दिवशी मला कोणीही प्रश्न विचारणार नाही.
प्रत्येक न्युज चॅनल आणि पत्रकार मी पुराव्यासह काय म्हणतोय ते ऐकतच राहतील. यामुळे ते नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्वांनी जोरदार टीका केली होती.
राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांनी विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावरून टीका केली होती. तसेच अनेक निर्मात्यांनी विक्रम गोखले यांच्यासोबत काम करणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे हा वाद चांगलाच वाढला आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: