‘या’ तीन खेळाडूंना संघात घेऊन फसला कोहली, टी-२० वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले

November 09, 2021 , 0 Comments

न्यूझीलंडने रविवारी टी-20 विश्वचषकात भारताचे स्वप्न भंगले. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला, त्यानंतर टीम इंडिया टी-20 विश्वचषकातून बाहेर पडली. भारत आणि नामिबिया यांच्यातील सोमवारी होणारा सामना हा कोहलीच्या टी-20 कर्णधारपदाचा शेवटचा सामना असेल.

२०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर कोहलीने टी२० कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. यावेळी भारताला विश्वचषकात प्रथमच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही भारताला हरवले. शास्त्री आणि त्यांच्या कोचिंग स्टाफचा हा शेवटचा सामना असेल.

टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया, विराट कोहली आणि निवड समितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या T20 विश्वचषकात असे 3 खेळाडू होते, ज्यांची कामगिरी अत्यंत खराब होती. या तीन खेळाडूंना टीम इंडियामध्ये परत संधी मिळणे कठीण आहे.

1. वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्तीला T20 विश्वचषकात संधी देणे ही टीम इंडियाच्या निवडकर्त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरी पाहून वरुण चक्रवर्तीला टी-२० वर्ल्डकपच्या संघात संधी देण्यात आली, मात्र या स्पर्धेत येताच त्याला काहीच खास कामगिरी करता आली नाही.

वरुण चक्रवर्तीला T20 विश्वचषकातील 3 सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. युझवेंद्र चहलसारख्या दमदार लेग-स्पिनरच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली, पण निवडकर्त्यांना त्याच्या चुकीबद्दल पश्चाताप झाला असेल. वरुण चक्रवर्तीला टीम इंडियाकडून खेळण्याची सुवर्णसंधी क्वचितच मिळेल.

2. भुवनेश्वर कुमार
31 वर्षीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये नसतानाही निवडकर्त्यांनी त्याला टी-20 विश्वचषकासाठी संधी दिली. हा निर्णय टीम इंडियाला खूप भारी पडला. भुवनेश्वर कुमारला या स्पर्धेत फक्त पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण त्याचा फलंदाजांनी धुव्वा उडवला.

यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. टीम इंडियाच्या या खेळीवरून आता भुवनेश्वर कुमारची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुवनेश्वर कुमारकडे ना गती आहे ना स्विंग.

3. हार्दिक पंड्या
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहे. या T20 विश्वचषकात हार्दिक पांड्याची कामगिरीही अत्यंत खराब होती, त्यानंतर त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पांड्याला कंटाळून भारतीय संघ व्यवस्थापन लवकरच दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याचा विचार करू शकते.

IPL 2021 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर एक खेळाडू खूप चर्चेत आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे त्याला संधी मिळू शकते. तुफानी फलंदाजीसोबतच वेंकटेश अय्यर घातक गोलंदाजीतही माहिर आहे. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे भारत आज टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या
ड्रग्ज प्रकरणात आता हिंदुस्तानी भाऊंची उडी, नवाब मालिकांना दिला इशारा 
अभिनेत्री कंगना राणावत व अदनान सामी यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान
आमचा एकच नवाब मलिक भारी पडला! तुमचा कधीच नंबर लागणार नाही, शिवसेनेचा भाजपवर हल्ला..
हे आहे टीम इंडियाच्या पराभवाची सगळ्यात मोठे कारण, प्रशिक्षकांनीच केला मोठा खुलासा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: