पोटच्या १२ वर्षीय मुलीसोबत बापाने केलं संतापजनक कृत्य; ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
: अश्लील व्हिडिओ दाखवून आणि नातेवाईकांना ठार मारण्याची धमकी देऊन पोटच्या मुलीचा लैगिंक छळ करणाऱ्या नराधम बापाला न्यायालयाने ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात फिर्यादी, पीडित मुलगी, आरोपीची सासू फितूर होऊन मिळालेला पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद लक्षात घेऊन कोर्टाने शिक्षा दिली. या घटनेची माहिती अशी की, आरोपी, पीडित मुलगी, तिचा भाऊ, आई आणि आजी हे एकत्रित राहात होते. ९ सप्टेंबर २०२० रोजी घरी कोणीच नसताना बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीला जवळ बोलावून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या शरीरावरून हात फिरवून तुला माणसाची शारीरिक भूक काय आहे, हे दाखवतो असं सांगून तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवला. ‘मी तुमची लहान मुलगी असून मला हे दाखवू नका’, अशी मुलीने बापाला विनंती केली. पण बापाने मुलीला ‘तू व्हिडिओ बघ नाहीतर तुझ्या आई, भाऊ आणि आजीला तलवारीने ठार मारीन’ अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने अश्लील व्हिडिओ पाहिला. मुलीने घडलेली घटना घाबरून कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२० रोजी घरातील सर्व जण हॉलमध्ये टीव्ही पहात होते. त्यावेळी बापाने मुलीला ‘तू रात्री एक वाजता माझ्याजवळ आली नाहीस, तर सकाळी तुझी आई, आजी आणि भावाला ठार मारतो’ अशी धमकी दिली आणि ‘सकाळी घरी कुणी नसताना आपले नग्न फोटोशूट करुया. तुझ्यासाठी काय म्हणेल ते करायला तयार आहे’ असं म्हणाला. मुलीच्या आईने पतीचं हे बोलणे ऐकल्यावर त्याबद्दल जाब विचारला. त्यावेळी बापाने स्वत:ची आई, पत्नी यांच्याशी भांडण काढून घरातील तलवार बाहेर काढून ‘तुम्हाला आता सोडत नाही. एकेकाला संपवतो’ असे म्हणून तलवार घेऊन त्यांच्या मागे लागला. घरातील सर्वजण पळून सांगली फाटा येथे पीडित मुलीच्या आजोबांच्या घरी गेले. त्यांनी घडलेली घटना आजोबांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने राजारामपुरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दरमयान, या खटल्याची नंतर सुनावणी झाली. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. पण फिर्यादी मुलीची आई, मुलीची आजी आणि पीडित मुलगी फितूर झाल्या. पण उलट तपासात त्यांनी सर्व गोष्टी मान्य केल्या. आरोपीने लपवलेली तलवार काढून देणाऱ्या पंच साक्षीदार सुभाष दिवसे यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासी अधिकारी पीएसआय अंजना फाळके, समाधान घुगे यांनी जमा केलेला पुरावा आणि सरकारी वकील पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ११ हजार रुपयाचा दंड ठोठावला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: