मालिकांसाठी आता त्यांची मुलगी मैदानात, फडणवीसांना म्हणाली चुकांची फळ भोगायला तयार रहा..
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत. ड्रग्ज प्रकरण, अंडरवर्ल्डशी असलेले संबंध यावरून जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर आज मलिक यांनी मोठे गौप्यस्फोट केले.
आता मलिक यांची मुलगी याप्रकरणी आक्रमक झाली आहे. मलिकांची मुलगी निलोफर मलिकने फडणवीसांच्या टि्वटला उत्तर दिले आहे. आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा, असे निलोफरने म्हटले आहे.
यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना बिगडे नवाब असे म्हटले होते. त्यावरही निलोफर मलिक यांनी टि्वट करुन उत्तर दिले आहे. कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही.
जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे’ अशी टीका निलोफर मलिक यांनी केली. यामुळे आता मलिक यांची मुलगी मैदानात उतरली आहे.
फडणवीसांनी ट्विटमध्ये ‘आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडते, असे म्हटले होते. यामुळे मालिकांच्या मुलीने त्यांना उत्तर दिले आहे.
तसेच भाजपची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले. नागपूरचा मुन्ना यादव याच्यावर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत, तो फडणवीस यांचा साथीदार आहे, असे म्हणत मलिक यांनी गंभीर आरोप केले होते.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: