अफगानिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने केली होती मॅचफिक्सिंग? त्या व्हिडीओमुळे चर्चांना उधान

November 05, 2021 , 0 Comments

भारताने अफगानिस्तानवर सहज विजय मिळवला. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताने जबरदस्त कमबॅक केला. पण हा सामना भारताने जिंकल्यानंतर अनेक लोकांनी भारतीय संघावर फिक्सींगचे आरोप लावण्यास सुरूवात केली आहे. हे आरोप लावताना एक व्हिडीओ वारंवार समोर येत आहे.

सलग दोन सामने गमावल्यानंतर इतका जबरदस्त कमबॅक केल्यानंतर कोणाला विश्वासच बसत नाहीये की भारताने टी-२० मध्ये इतका विशाल स्कोर उभा करून अफगानिस्तानसारख्या टीमला हरवले. एका व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर मोठा राडा सुरू झाला आहे. पाकिस्तानी चाहते वारंवार हा व्हिडीओ शेअर करून भारताला ट्रोल करत आहेत.

भारतीय संघ फलंदाजी करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. ही गोष्ट ११ व्या षटकात घडली होती. त्यामध्ये रोहित शर्मा एक फटका मारताना दिसत आहे. हा फटका मारल्यानंतर अफगानिस्तानचा खेळाडू चेंडू अडवायला जातो. पण चेंडू अडवताना त्याच्या हाताला लागतो आणि थेट सीमारेषेपार जातो.

त्यानंतर भारताला चार धावा मिळतात. या व्हिडीओनंतर भारत आणि अफगानिस्तान यांच्यातला सामना फिक्स असल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे. अफगानिस्तानचे खेळाडू या सामन्यात अभिनय करत असून हा सामना फिक्स असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसते की चेंडू अडवण्याची संधी अफगानिस्तानच्या खेळाडूकडे होती पण त्याच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेपलीकडे जातो.

भारत आणि अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाचे चांगले संबंध आहेत. भारताने बऱ्याचदा अफगानिस्तान क्रिकेट मंडळाला आणि खेळाडूंना मदत केली आहे. त्यामुले हा सामना अफगानिस्तानने भारताला जिंकू दिला असे काही जण म्हणत आहेत. हा सामना भारताने जिंकल्यानतंर सोशल मिडीयावर मॅच फिक्सिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे.

याबाबत कोणताही पुरावा कोणाकडेच नाही हे देखील एक सत्य आहे. अफगानिस्तानच्या खेळाडूकडून चूक नक्की झाली आहे पण याआधीही अशा बऱ्याच चुका क्रिकेटमध्ये झाल्या आहेत त्यामुळे या आरोपामध्ये काहीच तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. चेन्नई सुपर किंग्सने जेव्हा दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला होता तेव्हाही फिक्सरकिंग्स हा ट्रेंड सोशल मिडीयावर चालू झाला होता.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! पालकांनो काळजी घ्या, ३ वर्षांच्या मुलाने Pop-Up फटाका गिळला आणि गमावला जीव
युपीत ३० टक्के लोकांना भाकर मिळेना आणि लावले १२ लाख दिवे, लागले ३६ हजार लीटर तेल
दिवाळीत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत ९ हजार रूपयांनी स्वस्त झाले सोने
अफगानला ९९च्या आत रोखले असते तर भारत सेमीफायनला पोचला असता, पण आता करावा लागेल ‘हा’ चमत्कार


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: