पुनीत राजकुमार मृत्यूनंतरही ४ तरुणांना देऊन गेला जीवनदान! आठवणीने देश हळहळतोय

November 04, 2021 , 0 Comments

गेल्या आठवड्यात चित्रपट क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. कन्नड सुपरस्टार, अभिनेता पुनीथ राजकुमार याच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ही बातमी ऐकून अनेकांना धक्का बसल्याने काही जणांचे निधन देखील झाले होते. या बातमीने संपूणर मनोरंजन विश्वाला हादरून टाकले.

अभिनेता पुनीथ राजकुमारच वय केवळ ४६ वर्षे होते. समाजसेवेसाठी सतत पुढे आणि तत्पर म्हणून पुनीथ राजकुमाराची सगळीकडेच ओळख होती. अनेक समाजकार्यामध्ये देखील तो सहभागी होत असे. यामुळे त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या चाहत्यांचा तो अगदी खास होता. त्याच्या निधनाच्या बातमीने, संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये उदासीनता पसरलेली होती.

देशात देखील त्याचे लाखो चाहते होते. आता अनेकांना प्रश्न पडतो, पुनीथ राजकुमाने असे काय केले होते की, तो सर्वांचा खास होता तर जिवंत असताना तर पुनीथ राजकुमारने अनेकांची मदत केली, निराधारांना आधार दिला. पण, आता मृत्यूपश्चात देखील त्याने चार तरुणांना जीवनदान दिले आहे.

यामुळे तो किती मदत करत होता याचा अंदाज आपल्याला येईल. या महानेत्याला श्रद्धांजली म्हणून, कर्नाटक सरकारने, ३१ ऑक्टोबर पर्यंत दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्याने ठरवल्या प्रमाणे नेत्रदान निधनानंतर नेत्रदान करण्यात आले आहे.

पुनीथ राजकुमारच्या नेत्रदानमुळे चार तरुणांना नवे जीवदान मिळाले आहे. पुनीतच्या डोळ्यांचे ट्रान्सप्लांट नारायण नेत्रालय या ठिकाणी करण्यात आले. यामुळे तो किती महान होता हे दिसून येते. यामुळे तो गेल्यावर आता अनेकांना हा धक्का पचवणे अशक्य होत आहे.

पुनीतच्या डोळ्यांचे ३ पुरुष तर १ महिला रुग्णात ट्रान्सप्लांट केल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तो जिवंत असताना तर, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर होता, मात्र आपल्या नेत्रदानाच्या निर्णयामुळे मृत्यनंतर देखील त्याने चार लोकांच्या जीवनात प्रकाश दिला. त्याच्या नेत्रदान करण्यात आलेले रुग्ण २० ते ३० वयोगटातील आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: