मुंबईच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनीच भारतात गाड्यांचे डिझेल इंजिन आणले….
सर धनजी शा कूपर मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान. ( त्याकाळी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हटलं जायचं) आणि वालचंद हिराचंद. भारतात मोटार फॅक्टरी पासून ते चॉकलेट कारखाना उभारण्यापर्यंत अनेक उद्योगांची पायाभरणी करणारे उद्योगपती. असे हे दोन दिग्गज एकत्र आले तर काय होईल?
1992 साली सातारारोड येथे धनजीशा कूपर आणि वालचंद हिराचंद यांनी पहिलं वहिलं डिझेल इंजिन बनवलं. वालचंद हिराचंद आणि धनजीशा कूपर हे आज घडीला उद्योग क्षेत्रातील सगळ्यात मोठे व्यक्तिमत्त्व मानले जातात. भारताच्या आधुनिकीकरण जगात या दोन व्यक्तींची महत्वाची भागीदारी मानली गेली. या दोन व्यक्तींनी डिझेल इंजिन बनवण्याची तयारी कशी केली आणि त्याची यशोगाथा काय आहे ते जाणून घेऊया.
सर धनजीशा आणि वालचंद हिराचंद यांनी प्रवासी कार आणि डिझेल इंजिन बनवण्यासाठी एकत्र येऊन काम केलं. या दोघांना भारतातील ऑटोमोबाईल युगाचे प्रणेते मानले जाते. डंकन स्टेटनच्या सहकार्याने सर धनजीशा कूपर यांनी भारतात डिझेल इंजिन बनवण्यासाठी हिंदुस्तान इंजिनिअरिंग अँड इम्प्लीमेंट कंपनीची स्थापना केली. क्रँकशाफ्ट, इंधन पंप, व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह मार्गदर्शक, बेअरिंग, पिस्टन रिंग, कॅमशाफ्ट इत्यादी इंजिनचे भाग परदेशातून आयात केले गेले.
पण इंग्रजांना ‘नेटिव्ह’ लोकांनी इंजिन बनवणे हे काय पचत नव्हतं. त्यांनी वालचंद आणि कूपर यांच्यात फूट पाडण्याचं आणि काम बंद पाडण्याचं काम केले. मध्ये वितुष्ट आलं पण काही दिवसांनी वालचंद सर धनजीशा यांना भेटले आणि त्यांनी सहकार्य करण्याचे आणि पुन्हा एकत्र काम करण्याचं मान्य केले.
वालचंद यांनी एक साध लेथ मशीन देऊन साताऱ्यात कूपर उद्योगसमूह उभारणीची पायाभरणी केली.
संयुक्तपणे, 1940 मध्ये वालचंद हिराचंद अध्यक्ष आणि सर धनाजीशा कूपर, नरिमन कूपर, लालचंद हिराचंद आणि गुलाबचंद हिराचंद संचालकांसह कूपर इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना झाली.
1942 मध्ये, कूपर कंपनीने पहिले भारतीय डिझेल इंजिन बनवले आणि मॉरिस कारवर त्याची यशस्वी चाचणी केली. 2000 हून अधिक कर्मचार्यांसह व्यवसायाची भरभराट झाली, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि कंपनीची भरभराट करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी औद्योगिक टाउनशिपमध्ये सर्व सुविधा पुरविल्या गेल्या.
1947 मध्ये सर धनजीशा यांच्या मृत्यूनंतर, सेठ वालचंद यांनी रॉयल्टीद्वारे कुटुंबाला मदत केली आणि सर धनजीशा कूपर यांच्या सन्मानार्थ कूपर हे नाव त्यांच्या मोठ्या कामांना ठेवलं. सेठ वालचंद यांनी 1968 पर्यंत मार्केटिंग एजन्सीद्वारे कुटुंबाला आर्थिक मदत केली. सेठ लालचंद हिराचंद यांनी 1962 मध्ये सातारा इंडस्ट्रियल वर्क्स सुरू करण्यासाठी सॅम एन कूपर यांना अत्यंत नाममात्र दरात लेथ मशीन दिले. तिथून सुरू झालेला तो प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
हे ही वाच भिडू :
- सांगलीच्या फेमस इंजिनियरिंग कॉलेजची निर्मिती वालचंद यांनी नाही तर धोंडूमामा यांनी केलीय..
- हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा पाया सोलापूरच्या वालचंदंनी रचला, भरारी कोल्हापूरच्या घाटगेंनी दिली.
- स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती.
- स्वत:च्या हातांनी संडासच भांड साफ करुन, जेआरडी टाटांनी एअर इंडिया उभा केली होती.
The post मुंबईच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनीच भारतात गाड्यांचे डिझेल इंजिन आणले…. appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: