शेवटच्या सामन्याआधी भारतीय संघाचा मैदानात उतरण्यासही नकार, आव्हान संपुष्टात आल्याने टीम नाराज
दुबई । सध्या टी-20 वर्ल्डकप सुरू असून भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे सध्या भारतीय चाहते नाराज झाले आहेत. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. ज्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ज्यामुळे सर्व भारतीयांसह क्रिकेट टीमही नाराज आहे. आता सेमीफायनलमध्ये जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
आता भारताला नामिबीयाविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. पण त्यापूर्वी रविवारी सायंकाळच्या सरावासाठी भारतीय संघ मैदानावरच आला नसल्याचे दिसून आले आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू निराश असल्याचे यातून दिसून आले.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होत खूप मागे पडले. यामुळे भारताचे आव्हान खडतर झाले होते. पाकिस्तानने 4 पैकी 4 आणि न्यूझींलडने 5 पैकी 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
कालचा सराव ऑप्शनल होता, कोणतंही बंधन नव्हते की सरावासाठी खेळाडूंनी यावे. पण जर भारताचे स्पर्धेतील आव्हान शिल्लक असते तर खेळाडू उत्साहाने नक्कीच सरावासाठी आले असते. मात्र भारतीय टीम सरावासाठी आली नाही. जरी हा सामना जिंकला तरी आता काही फायदा होणार नाही.
9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यात अपयशी झाला आहे. यामुळे चाहते नाराज झाले आहेत. यामुळे टीमवर टीका केली जात आहे. आता टीमचा कर्णधार आणि कोच बदलले जाणार आहेत.
अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर ब गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने धडक मारली आहे. आज भारत आणि नामेबिया यांच्यात विश्वचषकातील अखेरचा साखळी सामना असेल.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: