अहमदनगर रुग्णालय आग: व्हेंटिलेटरच्या मुद्द्याला पालकमंत्री मुश्रीफ यांचे समर्थन
अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला पंतप्रधान निधीतून मिळालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन आग लागल्याचा आरोप आमदार () यांनी केला होता. या सर्व मुद्द्यांनुसार संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करणार आणि दोषींवर कारवाई करणार असल्याची घोषणा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री (Hasan Mushrif) यांनी केली. (Guardian Minister supports ventilator issue in Ahmednagar hospital case) पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने अहमदनगरला येत जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची रात्री पाहणी केली. आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, महापौर गणेश भोसले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय, पोलिस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संपूर्ण घटनेची चौकशी होणार, या वाक्यावर जोर दिला होता. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर निश्चित कारवाई करू, असे यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले. हिंदीमध्ये संवाद करत "किसी को भी नही बक्ष गें", असा डायलॉग पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी मारला. क्लिक करा आणि वाचा- विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त यांच्या चौकशीनंतर आरोपींची नावे निश्चित होतील, असेही त्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: