हातात बांगड्या भरून एसटी कर्मचारी ड्युटीवर; आता तरी न्याय मिळणार का?

November 08, 2021 , 0 Comments

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असे असताना आता कर्मचारी आंदोलन करत आहेत. अनेकजण आत्महत्या देखील करत आहेत. त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. यामुळे ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. आता रत्नागिरी जिह्यात दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. आता दापोलीतही आंदोलन केले जात आहे. यामुळे हे आंदोलन आता लवकर मिटणार नसल्याचे दिसून येत आहे.

यावेळी दापोली एसटी डेपोतील चालक अशोक वनवे यांनी सांगितले की, आपल्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा असे सांगितले कामावर न आल्यास मेमो मिळेल ही भिती होती. मात्र कामावर जाणे देखील गरजेचे होते.

आमचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही. अवघ्या १३ हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे यातून तात्काळ चांगला निर्णय घ्यावा अशी मागणी वनवे यांनी केली.

तसेच ते म्हणाले, आमच्या मागण्याना आता आश्वासन नकोत तर आमचे दुःख समजुन घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. यामुळे यावर लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच एका कर्मचाऱ्याने एसटीला लटकून आत्महत्या केली होती.

सध्या राज्यभर यावरून आंदोलन सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा कोलमडली आहे. यामुळे आता यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. यामुळे आता राज्य सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: