‘तोतरे, धातरे, फातरे सर्वच येऊन बोलतात, मात्र आमचा एकच नवाब मलिक भारी पडला’
औरंगाबाद । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक चर्चेत आले आहेत. त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणी कारवाईमुळे केल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टीचा खुलासा करत खळबळ उडवून दिली होती. ते रोज पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी उघड करत होते.
आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची बाजू घेत विरोधकांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, तोतरे, धातरे, फातरे सर्वच येऊन बोलत असतात. पण आमचा एकच नवाब मलिक भारी पडला. नवाब मलिक यांचे एक तोंड उघडले आणि सर्वच जण बिळात जाऊन बसले.
नवाब मलिकांनी सर्वांची नवाबी खलास करून टाकली. सरकारला काही काम करूच द्यायचे नाही हे त्यांनी ठरवून टाकलंय. त्यामुळे रोजच कोणी ना कोणी येऊन बोलत असतात, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवण्यात खंबीर आहेत. मी तुम्हाला विधानसभेचे एक सोपं गणित सांगतो. शिवसेनेने ५० जागा निवडून आणायच्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही प्रत्येकी ५० जागा निवडून आणायच्या. म्हणजे दीडशे जागा होतील.
तसेच काय भेटणार यांना? भाजपवाले पावणे दोनशे जागा निवडून आणू शकतात का? हे गणित लक्षात घ्या, आम्ही पुन्हा येऊ म्हणणाऱ्यांनो सत्ता विसरून जा, तुमचा कधीच नंबर लागू शकणार नाही, असेही अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर अनेज राजकीय घडामोडी घडल्या. नवाब मलिक यांनी अटक करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केला. यामुळे हा वाद सुरू झाला आहे. आता वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून टाकण्यात आला आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: